सावधान! WhatsApp वर सुरूय नवा स्कॅम, चुकूनही डायल करु नका 'हा' नंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 02:04 PM2022-05-12T14:04:25+5:302022-05-12T14:11:51+5:30

WhatsApp वर एक नवा स्कॅम सुरू आहे. नेमका काय आहे हा नवा स्कॅम आणि त्यापासून कसं दूर राहता येईल?

WhatsApp हे एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. यावर अनेक स्कॅमर्स देखील नजर ठेवून असतात. सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर नवा स्कॅम सुरू आहे. आजवर समोर आलेल्या विविध स्कॅमपैकी हा स्कॅम खूप वेगळा आहे. याबाबत एका इन्स्टाग्राम युझरनं सर्वांना अलर्ट केलं आहे.

इन्स्टाग्राम युझर parleenranhotra नं पोस्ट करत माहिती दिलीय की WhatsApp वर एका नवा स्कॅम सुरू आहे. याबाबत सावध राहण्याची नितांत गरज असल्याचं आवाहन करण्यात आलं आहे. एका अनोळखी नंबरवरुन फोन आल्याचं युझरचं म्हणणं आहे.

इंटरनेट कनेक्टिव्हिटीबाबत तुम्ही जी तक्रार केली होती त्यासंदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे, असं अनोळखी नंबरवरुन कॉल आलेल्या व्यक्तीनं म्हटलं. त्यावर युझरनं माझे वडील घरी नाहीत आणि फॅमेली प्लान असल्यानं याची सर्व कामं ते पाहात असतात, असं सांगितलं.

इतकं बोलून युझर कॉल कट करणार होती तितक्यात समोरुन तुम्हाला एक नंबर डायल करावा लागेल असं सांगण्यात आलं. जेणेकरुन तुम्हाला एक-दोन दिवसांनंतर यासाठी कॉलबॅक करता येऊ शकेल. कॉल करणाऱ्या व्यक्तीनं *401* आणि एक मोबाइल नंबर डायल करण्यासाठी सांगण्यात आलं.

युझरनं सर्व सूचनांचं पालन केलं आणि १० मिनिटांनंतर युझरला व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज आला. यात नव्या डिव्हाइसवर अकाऊंट सेट करण्यासाठी पिन देण्यात आला होता. मोबाइल आणि पीसीवरुन त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप लॉग आऊट झालं.

धक्कादायक बाब अशी की युझरनं *401* आणि पुढे मोबाइल क्रमांक डाएल केल्यामुळे संबंधित मोबाइल क्रमांकाचे सर्व कॉल्स डायव्हर्ट झाले होते. याचाच फायदा घेत स्कॅमरनं त्याचं व्हॉट्सअ‍ॅप स्वत:च्या मोबाइलमध्ये लॉगइन करुन घेतलं होतं.

व्हॉटॉ्सअ‍ॅप हॅक झाल्यानंतर स्कॅमरनं जवळपास ५० कॉन्टॅक्ट्सना मेसेज करुन पैशांची मागणी केली. काहीतरी अडचण किंवा गरज असेल म्हणून पैशांची मागणी होत आहे असं समजून काहींनी पैसे ट्रान्सफर देखील केले.

युझरला याची माहिती मिळताच त्यानं आपलं सिम कार्ड ब्लॉक केलं. पण त्याचं व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट लॉगइन होत नव्हतं. कारण स्कॅमरनं त्यावर टू-फॅक्टर ऑथिंटीफिकेशन पिन सेट केला होता. ७ दिवसांनंतर व्हॉट्सअ‍ॅपला रितसर तक्रार केल्यानंतर युझरला त्याच्या अकाऊंटचा अ‍ॅक्सेस मिळाला.

व्हॉट्सअ‍ॅपवर होणाऱ्या या स्कॅमबाबत युझरनं सर्वांना अलर्ट केलं आहे. कुणाच्याही भुलथापांना बळी पडू नका. तसंच तुमचा मोबाइल नंबर आणि *401* सोबत डायल करु नका असं आवाहन केलं आहे. तसंच व्हॉट्सअ‍ॅपच्या टू-फॅक्टर ऑथिंटिफिकेशनचाही वापर करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कोणत्याही अनोळख्या लिंकवर क्लिक करू नये.