Amazon वर मिळतेय ऑफर, ४० टक्के डिस्काऊंटसह खरेदी करू शकता स्मार्टफोन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 11:13 AM2021-02-23T11:13:39+5:302021-02-23T11:21:17+5:30

amazon fab phones fest : Samsung, Oneplus, Xiaomi, Apple सह अनेक स्मार्टफोनवर मिळतेय ऑफर

Amazon इंडियानं Fab Phones Fest सेलची घोषणा केली आहे. यामध्ये अनेक ब्रॅन्ड्सचे स्मार्टफोन्स आणि अॅक्सेसरीज विकत घेता येणार आहेत. तसंच यावर 40 टक्क्यांपर्यंतची सूटही देण्यात येईल. हा सेल सध्या सुरू झाला असून तो उद्या म्हणजेच 25 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

यामध्ये नव्यानं लाँच झालेल्या Samsung M02, Samsung M02s, Redmi 9 Power, Mi 10i यांसारख्या स्मार्टफोन्सवरदेखील सूट मिळेल. या सेलमध्ये ग्राहकांना मोठ्या ब्रॅन्ड्सच्या स्मार्टफोन्सवरही सूट मिळेल. यामध्ये शाओमी, अॅपल, सॅमसंग, ऑनरसारख्या स्मार्टफोन्सचाही समावेश आहे.

या सेलदरम्यान ज्या ग्राहकांकडे कोट महिंद्रा बँकेच्या कार्डावरून केलेल्या तसंच ईएमआय केलेल्या ट्रान्झॅक्शन्सवर 10 टक्क्यांची सूट मिळणार आहे. या अंतर्गत सर्वाधिक 1,250 रूपयांची सूट मिळेल.

तसंच प्राईम मेम्बर्सकडे HDFC बँकेचं क्रेडिट अथवा डेबिट कार्ड असल्यास त्यांना नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही मिळेल.

या सेलदरम्यान Samsung Galaxy M02s 10,499 रूपयांऐवजी 8,999 रूपयांना विकत घेता येऊ शकतो. तसंच Vivo V20 2021 हा स्मार्टफोन 27,990 रुपयांऐवजी केवळ 24,990 रुपयांना खरेदी करता येऊ शकतो.

तर दुरीकडे Lava Z1 ची किंमत 5,999 रुपयांऐवजी 4,999 रुपये इतकी आहे. Samsung Galaxy M02 ची किंमत 7,999 रुपये इतकी आहे. परंतु तो 6,999 रुपयांना खरेदी करता येऊ शकतो.

OnePlus 8 Pro ची सेलमध्ये किंमत 54,999 रुपये आहे. तर OnePlus 8 Pro 54,999 रुपयांऐवजी 47,999 रुपयांना खरेदी करता येईल. Redmi 9 Power ची किंमत 13,999 रुपये इतकी असून तो या सेलमध्ये त्याची किंमत 10,499 रुपये आहे.

Samsung Galaxy M51 हा स्मार्टफोन 28,999 रुपयांऐवजी या सेलदरम्यान 21,749 रुपयांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तर Redmi Note 9 Pro हा स्मार्टफोन 16,999 रुपयांऐवजी 11,999 रुपयांना खरेदी करता येईल.

याव्यतिरिक्त या सेलमध्ये आयफोन्सवरही मोठी सूट मिळत आहे. iPhone 12 Mini ची किंमत 69,900 रुपये असून तो या सेलमध्ये 64,900 रूपयांना खरेदी करण्याची संधी मिळेल.

या सेलमध्ये पॉवर बँकवर 60 टक्क्यांपर्यंतची तर हेडसेटवरही 60 टक्क्यांची सूट देण्यात येत आहे. प्रिमिअम मोबाईल केसवरही 80 टक्क्यांपर्यंतची सूटही मिळत आहे.