जगातले सर्वात विचित्र वर्ल्ड रेकॉर्ड्स, वाचून चक्रावून जाईल डोकं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 02:39 PM2019-05-31T14:39:38+5:302019-05-31T14:45:43+5:30

जगभरात असे अनेक लोक असतात ज्यांना वेगळं काही करायचं असतं. यातील लोक तर अजब वर्ल्ड रेकॉर्डही आपल्या नावावर करून घेतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही विचित्र वर्ल्ड रेकॉर्डबाबत सांगणार आहोत. जे वाचून तुम्ही हैराण व्हाल. सोबतच प्रश्नातही पडाल की, असं कसं होऊ शकतं?

तुम्ही तलवार गिळल्याचं कधी ऐकलं आहे का? नक्कीच असं काही ऐकलं नसणार. पण अमेरिकेतील नताशा वेरूस्का नावाच्या महिलेच्या नावावर सर्वात लांब तलवार गिळंकृत करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. २८ फेब्रुवारी २००९ मध्ये तिने ५८ सेंटीमीटरची तलवार सहजपणे गिळली होती. हा एक अजब वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

ब्रिटनच्या सायमन एलमोर नावाच्या व्यक्तीने एकत्र चारशे स्ट्रॉ तोंडात धरून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला होता. त्याने ६ ऑगस्ट २००९ मध्ये जर्मनीमध्ये हा रेकॉर्ड केला होता. सायमनने ४०० स्ट्रॉ साधारण १० सेकंदासाठी तोंडात धरले होते.

एखाद्या व्यक्तीला घोड्याला बांधून फरफटत नेणे असं चित्र तुम्ही सिनेमात पाहिलं असेल. पण ऑस्ट्रेलियातील जोसेफ टॉटलिंग नावाच्या व्यक्तीने एक वेगळाच वर्ल्ड रेकॉर्ड कायम केला आहे. जोसेफने त्याच्या शरीरावर आग लावून ५०० मीटरपर्यंत स्वत:ला घोड्याने फरफटत नेण्याचा रेकॉर्ड कायम केला आहे. हा रेकॉर्ड त्याने २७ जून २०१५ ला केला होता.

तुम्हाला जर कुणी तोंडाने फुगे फुगवायला सांगितले तर दोन-चार फुगे फुगवून तुमचं तोंड दुखायला लागेल. पण अमेरिकेच्या कोलाराडोमध्ये राहणाऱ्या हंटर इवन नावाच्या व्यक्तीने तोंडाने ९१० फुगे फुगवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

यूक्रेनमध्ये राहणाऱ्या ओल्गा लीशचुक नावाच्या महिलेने एक फारच विचित्र रेकॉर्ड केला आहे. ओल्गाने १४.६५ सेकंदात तिच्या मांड्यांनी तीन कलिंगड फोडण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. हा रेकॉर्ड त्यांनी २६ जून २०१४ मध्ये इटलीमध्ये केला होता.

अमेरिकेची राहणाऱ्या आयना विलियम्सने सर्वात लांब नखांचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. तिचे नखे १०.९ इंच इतके लांब आहेत.

टेक्सासची लिंसी लिंडबर्ग नावाच्या महिलेने सुद्धा एक अजब रेकॉर्ड नावावर केला आहे. या महिलेने जास्तीत जास्त टेलिफोन डायरेक्टरी फाडण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. १६ नोव्हेंबर २०१४ मध्ये तिने एका मिनिटात एक हजार पानांच्या ५ टेलीफोन डायरेस्टरी फाडल्या होत्या.