झूम कॉलमध्ये मुलांसह लाईव्ह होता शिक्षक; पत्नीसह रोमान्स करताना कॅमेरा सुरूच राहिला, अन् मग.....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 11:34 AM2021-04-30T11:34:00+5:302021-04-30T11:54:33+5:30

Viral News School teacher caught Romance with wife : या शिक्षकाला आपल्या चुकीची जाणीव झाल्यानंतर त्यानी सगळ्यांची माफी मागण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, या सगळ्यात माझी चूक होती.

कोरोनाच्या माहामारीमुळे आता जास्तीत जास्त गोष्टी या ऑनलाईन पूर्ण केल्या जात आहे. सरकारी अधिकारी, खासगी क्षेत्रात कार्यरत लोक, शाळा, महाविद्यालयातील शिक्षकही मुलांना शिकवण्यासाठी ऑनलाईन कॉलिंगचा वापर करत आहेत. ऑनलाईन मिटिंग दरम्यान अशा अनेक घटना घडतात ज्यावेळी लोकांना मान खाली घालावी लागते.

सोशल मीडियावर गेल्या वर्षभरात अशा अनेक व्हायरल घटना तुम्ही पाहिल्या असतील. आता कोलंबियातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका शिक्षकाचा विचित्र प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

डेलीमेलनं दिलेल्या वृत्तानुसार ही घटना कोलंबियातील एका कॅथलिक शाळेच्या शिक्षकासह घडली आहे.

ऑनलाईन क्लास संपताच हा शिक्षक आपल्या पत्नीजवळ गेला. यावेळी कॉलिंग बंद करण्याचे बटण दाबायला विसरला.

यावेळीच हा शिक्षक सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या पत्नीसह रोमान्स करताना दिसून आला. जेव्हा त्याला कळलं की आपण कॅमेरात बंद करायला विसरलो आहोत. त्यावेळी त्यानं कॉल बंद केला, पण तोपर्यंत ही घटना व्हायरल झाली होती.

या शिक्षकाला आपल्या चुकीची जाणीव झाल्यानंतर त्यानी सगळ्यांची माफी मागण्याचा प्रयत्न केला.

ते म्हणाले की, ''या सगळ्यात माझी चूक होती. नजरचुकीनं मी कॅमेरा बंद करायला विसरलो आणि सगळा घोळ झाला.

मी हे काहीच मुद्दाम केलेलं नाही. माझ्या हातून चुकून हे घडलं. यासाठी कृपया मला क्षमा करा. ''

कॅथलिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी या घटनेची तपासणी सुरू केली आहे.

(Image Credit- Daily mail, Getty Images )

Read in English