Avengers Endgame चं तिकीट मिळाल्याचा आनंद अन् न मिळाल्याचं दु:खं काय असतं ते बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 03:56 PM2019-04-24T15:56:23+5:302019-04-24T16:04:44+5:30

सोशल मीडियात सध्या एकतर सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती निवडणुकीची. पण यात आणखी विषयाची चर्चा मजेदारपणे सुरु आहे. ती म्हणजे Avengers Endgame या हॉलिवूड सिनेमाची. येत्या २६ एप्रिलला हा बहुचर्चीत सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाची तिकीटेही धडाल विकली जात आहेत. मार्व्हलच्या या सिनेमाची चाहते इतक्या आतुरतेने वाट बघत होते की, दर सेकंदाला १८ तिकीटे विकली जात आहेत. मार्व्हलचा हा २२वा सिनेमा आहे. तुम्ही तिकीट बुक केलेलं असेल नसेल तरी त्याआधी हे भन्नाट मीम्स बघू शकता. त्यावरुन या सिनेमाची क्रेझ तुमच्या लक्षात येईल.