'ग्रुम्पी' मांजरीचे निधन; पाहा फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 03:14 PM2019-05-20T15:14:07+5:302019-05-20T15:21:18+5:30

सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्ध असलेल्या आणि जगातील सर्वात श्रीमंत मांजर अशी ओळख असलेल्या मांजरीचे निधन झाले. 'ग्रुम्पी' असे या मांजरीचे नाव होते.

अमेरिकेतील एरिजोना भागात राहत असलेल्या 'ग्रुम्पी'च्या मालकिनीने ट्विटरच्या माध्यमातून तिच्या निधनाची माहिती दिली.

गेल्या मंगळवारी मूत्रपिंडाचा संसर्ग झाल्यामुळे 'ग्रुम्पी'चं वयाच्या 7 व्या वर्षी निधन झाले.

जगातील सर्वात श्रीमंत मांजर म्हणून तिची ओळख होती.

हॉलिवूडचा चित्रपट देखील तिच्यावर बनवला गेला होता. जगातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॅगिझिनवरही कित्येकदा ती झळकली होती.

2012 साली 'ग्रुम्पी' मांजरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

यात तिच्या चेहऱ्यावरील रागट हावभाव दाखवण्यात आले होते.

हा व्हिडीओ टाकल्यानंतर काही दिवसांतच तिचे कोट्यवधी फॉलोवर्स झाले होते.