छोट्या-छोट्या दुःख-संकटांनी खचून जाता?... मग, हे फोटो वेगळंच बळ देऊन जातील!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 01:50 PM2019-05-07T13:50:58+5:302019-05-07T14:50:51+5:30

एखादी व्यक्ती जेव्हा या जगात जन्माला येते तेव्हा काहीना काही कमतरता त्याच्यात असतेच. त्यानंतरही कुणाकडे भरपूर पैसा आहे तर कुणाच्या घरात अठराविश्वे दारिद्र्य. हा फरक तेव्हाच बघायला मिळतो जेव्हा समोरचा तो दाखवतो. कारण या जगात असेही कितीतरी लोक आहेत, जे जन्मापासूनच कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त आहेत. पण तरी सुद्धा हे लोक स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे समजत नाहीत. (All Image Credit : www.boredpanda.com)

आज आम्ही तुमची भेट अशा काही मजबूत, साहसी आणि सुंदर लोकांशी ओळख करून देणार आहोत, जे Limb Differences या आजाराने ग्रस्त आहेत. या लोकांचे हे असे फोटो पाहून भलेही कमजोर पडू. पण हे लोक मानसिक आणि शारिरिक दृष्टीने इतरांपेक्षा फार वेगळे आणि खास आहे. जगात जगत असताना छोट्या मोठ्या गोष्टींमुळे आपण नाराज होतो, खचून जातो. पण त्यांना त्यांच्या या अशा असण्याचं अजिबात दु:खं नाही. त्यांचे हे सुंदर फोटोशूट Elise Dumontet या फोटोग्राफरने केलं आहे.

१) Jamie - Jamie असं सांगतो की, लोकांमध्ये Limb Differences बाबत जागरूकता करण्याची गरज आहे. त्यासोबतच १४ वर्ष व्हीलचेअरवर काढल्यावर आता Jamie प्रत्येत अडचणीचा सामना करण्यासाठी तयार आहे.

२) Chantelle आर्ट, डान्सिग आणि अ‍ॅक्टिंगमध्ये तरबेज आहे. सोबतच ती स्वीमिंग, टेनिस आणि नेटबॉलचीही चाहती आहे.

३) Dan याने स्वत:ला हे कधी जाणवूच दिलं नाही की, त्याला हात आणि खांदा नाही. हात आणि खांद्याशिवायही तो स्वत:ला इतरांसारखा मजबूत समजतो.

४) Nancy चा जन्मच एका पायाशिवाय झाला होता. त्यामुळे ती जेव्हाही बाहेर जाते तेव्हा लोक तिच्याकडे एकटक बघतात. इतकेच नाही तर लहान मुलांमध्येही तिला एकटेपणा जाणवतो. त्यामुळेच आता तिला Limb Differences बाबत लोकांमध्ये जागरूकता करायची आहे.

५) Andrew ही व्यवसायाने एक हेअरड्रेसर आहे. आणि ती कधीही कुणाच्या प्रश्नांना किंवा उत्तरांना घाबरत नाही.

६) Ashley ला सुद्धा शाळेत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शाळेतील कुणीही तिच्यासोबत खेळत नव्हते. त्यामुळे हात लपवण्यासाठी तिला फुल स्लीव्हचे कपडे घालावे लागत होते. पण आज ती फार खंबीर आहे.

७) Daniel बाबत यापेक्षा जास्त काय सांगावं की, त्याने BBC Daniel Guinness Book of Records आणि SquareEnix सारख्या कंपन्यांसोबत काम केलं आहे.

८) Monty हा DJ आहे. तो Clarinet, Piano आणि Guitar वादनातही तरबेज आहे. सोबतच त्याला Snowboarding, Cycling, Swimming आणि Running करणं पसंत आहे.

९) Mark हा एक्स सर्व्हिसमन आहे. त्याला स्पोर्ट्मध्ये फार आवड आहे.

१०) Mollie ला नेटबॉल, Gymnastics, Free Running, Ballet, Tap डान्सिग आणि Trampolining ची फार आवड आहे.

११) २६ वर्षीय Grace ला कॅन्सर झाला होता. त्यामुळे डॉक्टरांना तिचा अर्धा पाय कापावा लागला होता.

१२) Marleen ही दोन मुलांची आई आहे. तिला प्रवासाची फार आवड आहे. तसेच ती नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या अॅडव्हेंचरमध्येही सहभाग घेत असते.

१३) Kiryn ही बालपणापासूनच अशी आहे. तरी सुद्धा ती सामान्य मनुष्याप्रमाणे दोन्ही हातांनी काम करण्याचा प्रयत्न करते.

१४) Daisy ही लहान असली तरी मोठ्यांना लाजवेल अशी कामे करते. ती Gymnastics आणि Circus च्या माध्यमातून जगभरातील लोकांनी प्रेरित करण्याचं काम करते.

१५) फार लहान वयातच मोठमोठे कारनामे करणाऱ्या Neisha चं मत आहे की, स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा असेल तर कुणीही तुम्हाला रोखू शकत नाही. गेल्यावर्षी Neisha ने जर्मनीमध्ये झालेल्या European Cheer leading Championships पास केली होती.

१६) George ही सुंदर स्माईल बघून कोण म्हणेल की, इतरांपेक्षा वेगळी आहे.

१७) Oakley हा इतर मुलांप्रमाणेच सगळी कामे समजदारीने आणि सहजपणे करतो.

१८) Albie हा चिमुकलीला Symbrachydactyly आहे.

१९) Kelsey या चिमुकलीला Limb Difference असल्याने काहीही फरक पडत नाही.