कडक सॅल्यूट! जंगलाच्या आगीत होरपळलेल्या चित्त्याला डॉक्टरांनी दिलं जीवदान; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 03:00 PM2020-09-30T15:00:36+5:302020-09-30T15:35:00+5:30

तुम्हाला माहीतच असेलच असेल अॅमेझॉनच्या जंगलांना पृथ्वीची फुफ्फुसं म्हणतात. या जंगलात गेल्या दोन ते तीन वर्षांत आग लागण्याच्या घटना सातत्याने वाढताना दिसून येत आहेत.

या आगीमुळे जंगलातील प्राण्यांनाही नुकसानाचा सामना करावा लागतो. साऊथ आफ्रिकेतील जंगलात पुन्हा एकदा आग लागली आहे. या आगीमुळे अनेक प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या आगीत एक चित्ताही होरपळलेल्या अवस्थेत होता. या चित्त्याच्या पायाचे पंजे संपूर्ण आगीमुळे जळले होते.

जंगलातील आगीमुळे चित्त्याच्या पोटाचा मोठा भाग जळाला आहे. वर्ल्ड वाईड लाईफ फंडाकडून मिळालेल्या माहितीनुसार ब्राझिलमध्ये जवळपास १ लाख ७० हजार चित्ते आहेत.

इंजेक्शन देऊन या मादी चित्त्त्यावर उपचार सुरू होते.

तब्बल दोन आठवड्यांनी या मादी चित्त्यामध्ये सुधारणा दिसून येत आहे.

डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मादी चित्ता अखेर आपल्या पायांवर उभं राहण्यासाठी हळू हळू तयार होत आहे.