बाबो! 'चालान फाडा तो बिहार में हंगामा हो जाएगा', तरूणीचा भर रस्त्यात हाय व्होटेज ड्रामा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 10:48 AM2021-05-06T10:48:58+5:302021-05-06T10:59:39+5:30

Bihar News : तरूणी ड्यूटीवर तैनात पोलिसांना धमक्या देऊ लागली आणि म्हणाली की, तुम्ही मला चालान देऊ शकत नाही. सरकार विचार न करता लॉकडाऊन लावतं

पटणाच्या बोरिंग रोडवरील चौकात एका तरूणीने हाय व्होल्टेज ड्रामा केला. तरूणी पोलिसांसोबतच घटनास्थळी व्हिडीओ काढत असलेल्या मीडियाच्या लोकांवर चिडली. रात्री लॉकडाऊन दरम्यान तरूणी विना हेल्मेट आपल्या स्कूटीवर फिरत होती. यावेळी पोलिसांनी तिला अडवलं आणि चालान कापू लागले होते. यावर तरूणी इतकी भडकली की, भर रस्त्यात तिने धिंगाणा घातला.

तरूणी ड्यूटीवर तैनात पोलिसांना धमक्या देऊ लागली आणि म्हणाली की, तुम्ही मला चालान देऊ शकत नाही. सरकार विचार न करता लॉकडाऊन लावतं. या लॉकडाऊनमध्ये सामान्य लोकांना किती समस्या येतात. सरकारला याचं काही नाही. ती पोलिसांना म्हणाली की, जर तुम्ही माझं चालान कापलं तर मी तुम्हा सर्वाचं चालान कापणार. तुम्ही सर्वांची नोकरी जाईल आणि पूर्ण बिहारमध्ये गोंधळ होईल. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

यादरम्यान सर्वांनी तरूणीला प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ती काही ऐकायला तयार नव्हती. इतकंच नाही तर घटनास्थळी एसएसपी उपेंद्र शर्मा यांना बोलण्यासाठी तगादा लावू लागली. म्हणाली की, आज ११ वाजता मला ट्रेन पकडायची आहे. गेल्या तीन तासांपासून घरापासून स्टेशनला जाण्यासाठी गाडी शोधत आहे. पण कुठेही काही मिळत नाहीये.

रस्त्यावर तरूणीचा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू राहिला. ओरडून ओरडून ती बोलत राहिली की, लोक उपाशी मरत आहेत. इथे कुणाला कशाची पडली नाहीये. बस सरकारला लॉकडाऊनचा विचार आहे. मी विना हेल्मेट निघाले तर मला चालान लावलं जात आहे.

असे सांगितले जात आहे की, या तरूणीने आधीही असा ड्रामा केला होता आणि पोलिसांना धमक्याही दिल्या होत्या. पोलीस नियम तोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करत आहे. पोलिसांनी सांगितले की, कायद्याचं उल्लंघन करणाऱ्याला सोडलं जाणार नाही.

पोलीस म्हणाले की, तरूणी मनात येईल ते बोलत आहे. इतकंच काय तर ती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतही वाईट बोलली.

इतकंच नाही तर तरूणी पोलिसांना धमकी देत म्हणाली की, तिची मोठ्या लोकांसोबत ओळखी आहे. जर मला दंड ठोठावला तर तुमची नोकरी जाईल. पूर्ण बिहारमध्ये वादळ येईल. अशाप्रकारे मनात येईल ते ही तरूणी बोलत होती. बऱ्याच प्रयत्नांनंतर हे प्रकरण शांत करण्यात आलं.