Coronavirus: जाणून घ्या, तुमच्या शेजारी कोरोनाग्रस्त आढळला आहे तर काय कराल?; सरकारने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 05:53 PM2020-04-06T17:53:15+5:302020-04-06T17:59:14+5:30

जगातील 200 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसचा संसर्ग दररोज वाढत आहे. देशातील अनेक सरकारने लॉकडाऊन केले आहे. भारतातही 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसवर नियंत्रण ठेवणे सरकारांसाठी जितके महत्त्वाचे आहे तितकेच कोरोनाबद्दल पसरणार्‍या अफवांवर नियंत्रण ठेवणे देखील अधिक महत्वाचे आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशात ४ हजारांहून अधिक लोकांना बाधा झाली आहे तर १०० हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरसबद्दल सोशल मीडिया कडून बऱ्याच अफवा पसरवल्या जातात. त्या टाळता आल्या पाहिजे. त्यांच्यावर विसंबून राहिल्यास, आपण स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला धोका पोहचवू शकतो. जनतेच्या हितासाठी सरकारने सध्या अफवांवर नव्हे तर तथ्यावर विश्वास ठेवा असं सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

कोरोना अशा लोकांमध्ये आढळतो जे परदेश दौरा करुन देशात परतले आहेत. किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने होतो. तथापि, जर आपल्याला खोकला किंवा ताप येत असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच, कोविड चाचणी घ्यावी की नाही याचा निर्णय घ्या.

घाबरू नका. तुमच्या शेजारी जरी कोरोनाचा संसर्गग्रस्त रुग्णही आढळला असेल तर दिलेल्या सल्ल्याचे पालन करा आपल्या घरात रहा, संक्रमित रूग्णाच्या कुटूंबाला विलगीकरण कक्षात ठेवलं असेल. आपल्याला फक्त स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी लागेल. कोरोना रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांपासून अंतर ठेवा.

सहसा नाही. कोरोना एकमेकांशी संपर्क झाल्यामुळे होतो. जरी काही संशोधनातून असे समोर आले आहे की कोरोनाचे रुग्ण जिथे राहत होते तेथे रुग्णालयाच्या खोलीच्या वातावरणात कोरोना विषाणू आढळून आला आहे. परंतु हे जाणून घेणे अधिक महत्वाचे आहे की शिंका येणे किंवा खोकला असताना तोंडातून बाहेर पडणाऱ्या ड्रॉपमुळे कोरोना व्हायरस पसरला आहे. या थेंबांच्या संपर्कात असलेल्या भागास स्पर्श केल्यास व्हायरसची लागण होते.

जर कुटुंबातील एखाद्यास कोरोना असेल तर आपण प्रथम घर विलग ठेवा. घराबाहेर अजिबात जाऊ नका. वैद्यकीय पथक तुमच्याकडे एक हेल्पलाइन नंबर देऊन गेला असेल. आपण दररोज घरात रहावे आणि सर्दी, ताप आणि श्वास लागणे यासारखी लक्षणे दिसली पाहिजेत. घरात उपस्थित सर्व लोकांनी देखील एक मीटर अंतर ठेवले पाहिजे. स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. आपल्या घरात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले नाही तर संपूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होईल.

अर्थात, थुंकल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार देखील होऊ शकतो. कोरोना विषाणू थुंकीच्या माध्यमातून पसरतो. म्हणूनच आयसीएमआरने पान मसाला, गुटखा इत्यादी सेवन करणाऱ्यांना सर्वत्र थुंकू नये, असे आवाहन केले आहे.

नाही, असेही नाही. कोरोना विषाणूवर अद्याप कोणतंही औषध आलं नाही, परंतु भारतातील वाढते संसर्गग्रस्त रुग्णही बरे झाल्यानंतर घरी परतत आहेत. देशातील सर्व डॉक्टर कोरोनाच्या उपचारात गुंतले आहेत आणि सरकार सर्व शक्य गरजा पूर्ण करीत आहे. कोरोना विषाणूवर औषध नसलं तरी त्याच्या लक्षणांवर उपचार केले जात आहेत

कोरोना विषाणूची लस अद्याप सुरू केली गेली नाही, परंतु लसपेक्षा कोरोना रोखण्यासाठी सोशल डिस्टेंसिंगने बचाब होऊ शकतो. जर आपण आणि आपले संपूर्ण कुटुंब सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन केले तर आपल्याला कोरोना विषाणूचा धोका उद्भावण्याची शक्यता फार कमी आहे.