Coronavirus Fact Check: ‘आयुष काढा’ प्यायल्याने ३ दिवसात कोरोना रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह?; जाणून घ्या, व्हायरल मेसेजचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 01:02 PM2021-05-18T13:02:20+5:302021-05-18T13:22:58+5:30

Coronavirus: गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगात कोरोनाचं संकट पसरलं आहे. या संकटाशी मुकाबला करण्यासाठी माणसाच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती असणं गरजेचे आहे. त्यासाठी विविध काढा तज्ज्ञांकडून सांगितले जातात.

देशात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. रुग्णांना ऑक्सिजन, बेड्स उपलब्ध होत नसल्याने अनेकांचे जीव जातायेत. या सर्व बातम्यांमधून लोकांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होत आहे. परंतु याचाचा फायदा घेत काही जण अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.

कोरोना काळात सोशल मीडियावर अनेक मेसेज व्हायरल होत आहेत. यात शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काढा पिण्याचा सल्ला काही तज्त्रांनी दिला आहे. इतकंच नाही तर आयुष मंत्रालयानेही आयुष काढा पिण्याचं लोकांना आवाहन केले आहे.

आता सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे त्यात दावा केलाय की, आयुष काढा प्यायल्यानंतर कोरोना संक्रमित व्यक्ती ३ दिवसांत बरा होतो. आयुष मंत्रालयाकडून याबाबत केलेला प्रयोग यशस्वी झाला असल्याचं या मेसेजमध्ये सांगण्यात येते.

आयुष मंत्रालयाकडून ६ हजार कोरोना रुग्णांवर आयुर्वैदिक प्रयोग करण्यात आला त्यातील ५ हजार ९८९ रुग्ण अवघ्या ३ दिवसात बरे होऊन त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं सांगण्यात येते. या व्हायरल मेसेजमध्ये काढा बनवण्याबाबत साहित्य आणि कसा बनवायचा याचीही माहिती दिली आहे.

व्हायरल मेसेजमध्ये आयुष काढा बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे त्यात ३० ग्रॅम तुळसी पावडर. २० ग्रॅम काळीमिरी, ३० ग्रॅम सुंठ आणि २० ग्रॅम दालचिनी या वस्तूंचा समावेश आहे. हा काढा बनवताना त्यात साखरेऐवजी गुळाचा प्रयोग करा असं म्हटलं आहे.

पीआयबी फॅक्ट चेकमध्ये आयुष काढा प्यायल्याने कोरोनातून बरा होण्याचा दावा चुकीचा असून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणारा आहे असं म्हटलं. पीआयबीने सांगितल्याप्रमाणे हा काढा केवळ रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाकडून काढा पिण्याचं आवाहन केले आहे.

आयुष मंत्रालयाकडून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वैदिक उपाय सांगण्यात आला आहे. त्यात सकाळी १० गॅम चवनप्राश घ्या. डायबेटिस रुग्णांनी शुगर फ्री चवनप्राश घेणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.

तुळसी, दालचिनी, काळीमिरी. सुंठ यापासून बनवलेला काढा दिवसातून १-२ वेळा घ्या. त्याचसोबत आवश्यकतेनुसार या काढ्यात चवीसाठी गुळाचा अथवा ताज्या लिंबू रसाचा उपयोग करावा. तसेच १५० मिली गरम दूधात अर्धा चमचा हळद मिसळून दिवसातून १-२ वेळा प्या असं म्हटलं आहे.

दरम्यान, दिवसभर गरम पाणी प्या. ३० मिनिटं योगासन, प्राणायम आणि ध्यान करा. घरातच योगा करा आणि सुरक्षित राहा. जेवण शिजवताना त्यात हळद, जिरे, धणे आणि लसून यासारख्या पदार्थांचा वापर करावा असंही आयुष मंत्रालयाने सांगितले आहे. अधिक माहिती - https://www.ayush.gov.in/docs/Ayurved%20Self%20Care%20during%20Covid-19.pdf

कसा बनवायचा आयुष काढा - एका व्यक्तिसाठी तुळशीची पाने चार भाग, चार भाग म्हणजे ७-८ पाने, सुंठ दोन भाग, म्हणजे १ इंच तुकडा, काळी मीरी एक भाग म्हणजे २-३ मीरीचे भरड १०० मिली घेवून पाण्यात चहासारखे उकळवावे. चवीसाठी गुळ घालावा व गाळून प्यावे