पाण्याचा थेंब मुंग्यांची तहान कसा भागवतो हे दाखवणारा अद्भूत क्षण, मुंग्यांचं हे जगणं तुम्ही याआधी कधी पाहिलं नसेल...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 02:39 PM2020-06-11T14:39:15+5:302020-06-11T15:00:59+5:30

ही फोटोग्राफर फिलीपिन्सची असून तिचं नाव Analiza Daran De Guzman आहे. तिच्या या फोटोंचं कौतुक लोकांकडून तर केल जातच आहे.

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, अशक्य हा शब्द मुंग्यांच्या डायरीत नसतो. कितीही मोठी अडचण असू द्या मुंग्या पार करतात. याच मुंग्यांचं आयुष्य एका फोटोग्राफर तिच्या कॅमेरात कैद केलं. यातून तुम्हाला मुंग्यांचं जगणं आणखीन जवळून जाणून घेता येईल. (All image credit : facebook.com/anadgphotography)

ही फोटोग्राफर फिलीपिन्सची असून तिचं नाव Analiza Daran De Guzman आहे. तिच्या या फोटोंचं कौतुक लोकांकडून तर केल जातच आहे. पण तिला या फोटोंसाठी सन्मानितही करण्यात आलंय. पाण्याच्या एका थेंबाने मुग्यांना तहान भागवताना क्षण तिने कॅमेरात टिपला आणि ती एक इंटरनॅशनल कॉन्टेस्ट जिंकली.

या कॉन्टेस्टचं नाव होतं #Water2020. हा कॉन्टेस्ट एप्रिल महिन्यात फोटो शेअरिंग साइट Agora ने आयोजिक केला होता. यात तिला पहिला पारितोषिक आणि 1 हजार डॉलर म्हणजेच 75000 हजार रूपये रक्कमही मिळाली.

Analiza ही तीन मुलांची आई आहे. तसेच हे फोटो तिने तिच्या स्मार्टफोनमध्ये काढलेत. यासाठी तिने एक क्लिप-ऑन मायक्रो लेंसचा वापर केला होता. तसेच हे फोटो काढण्यासाठी तिने ट्रायपॉडचाही वापर केला नाही.

Analiza ला फोटोग्राफीची आवड आहे. सोबतच ती तिच्या परिवारासोबत Palawan च्या coron मध्ये हॉटेल चालवते.