सांगलीत ट्रॅक्टरला धडक होऊन भीषण अपघात, सहा पैलवानांचा मृत्यू, क्रूझरचा अक्षरक्ष: चक्काचूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 08:50 AM2018-01-13T08:50:48+5:302018-01-13T08:55:44+5:30

कडेगाव तालुक्यातील वांगी येथे झालेल्या भीषण अपघातात सहा पैलवानांचा मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टर आणि क्रूझरची धडक होऊन हा भीषण अपघात झाला.

सहा पैलवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

अपघात इतका जबरदस्त होता की क्रूझरचा अक्षरक्ष: चक्काचूर झाला आहे. मृत पावलेले पैलवान क्रांती कुस्ती संकुलातील असल्याची माहिती मिळाली आहे.

साताऱ्यातील औंध येथे कुस्त्या खेळून परतताना हा अपघात घडला.

सध्या सांगली-कडेगाव भागातील साखर कारखान्यांना ऊसाचे गाळप सुरु असून त्यासाठी परिसरातील मुख्य रस्त्यांवर ऊसाची वाहतुक करणारे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीज मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत.