पत्नीचे लफडे पतीने खुल्या दिलाने माफ केले; पण एकच अट ठेवली, वाचून धक्का बसेल...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 03:30 PM2021-01-30T15:30:03+5:302021-01-30T15:38:35+5:30

Relationship love, affaire: महिलेने तिचे दु:ख सांगताना म्हटले की, तिच्याकडून एक मोठी चूक झाली होती. दोन वर्षांपूर्वी तिच्या ऑफिसमध्ये असलेल्या सहकाऱ्यासोबत सूत जुळले होते. आता तिला याचा पश्चाताप होत आहे.

एका महिलेने रिलेशनशिप पोर्टलवर तिच्या वैवाहिक आयुष्यातील गोष्टीचा गौप्यस्फोट केला आहे. महिला दोन मुलांची आई आहे, आणि तिचा पती तिच्यावर तिसऱ्या मुलासाठी दबाव टाकत आहे. तिसरे मुल तिला नको आहे.

महिलेने तिचे दु:ख सांगताना म्हटले की, तिच्याकडून एक मोठी चूक झाली होती. दोन वर्षांपूर्वी तिच्या ऑफिसमध्ये असलेल्या सहकाऱ्यासोबत सूत जुळले होते. आता तिला याचा पश्चाताप होत आहे.

महिला म्हणते की, तिचा पती हॅरीवरील प्रेम कमी होऊ लागले होते. मला वाटत होते की माझा प्रियकर माझ्यावर खरे प्रेम करतो. मी त्याच्यासोबत नवीन आयुष्य सुरु करण्याचे स्वप्न पाहू लागले होते. मात्र, तो अन्य एका महिलेसाठी मला धोका देत असल्याचे समजल्यावर हृदय तुटले.

''माझे आयुष्य उद्धवस्त करण्यासाठी मीच जबाबदार आहे. वाईट बाब अशी की या लफड्याची माहिती माझ्या पतीलाही मिळाली होती. तो मनातून तुटला होता, परंतू त्याने मला माफ केले. आम्ही एकमेकांना समजावले आणि लग्न वाचविले.''

मात्र, पतीने तिच्यासमोर वेगळीच अट ठेवली. त्याला तिसरे मुल हवे आहे. याचे कारणही माहिती असल्याचे या महिलेने सांगितले. त्याला नाते कायम आणि विश्वास पटण्यासाठी तिसरे मुल हवे आहे. मी त्याला अनेकदा सांगितलेय की पुन्हा अफेअर करणार नाही. मी जे केले त्याचा पश्चाताप होतोय, असे ती म्हणाली.

महिलेने तिला असलेला आक्षेपही नोंदविला आहे. मला वाटत नाही की मी तिसऱ्या मुलाला सांभाळू शकेन. मी आताही भावनिक दृष्ट्या कमजोर आहे. मात्र, हॅरी सारखा तिसऱ्या मुलाला जन्म देण्यास सांगत आहे.

मागच्या दोन बाळंतपणामध्ये मी खूप आजारी पडली होती. आता तेच विचार करून भीती तयार होत आहे. मानसिकदृष्ट्याही मी तिसऱ्या मुलासाठी तयार नाहीय. दोन मुलेच सांभाळणे कठीण जात आहे, असे ती म्हणाली.

नुकताच मला एक्स बॉयफ्रेंडचा ईमेल आला होता. यात तो माझ्या तब्येतीची विचारपूस करत होता. मी त्याला लगेचच ब्ल़ॉक केले. हॅरी ते पाहिल अशी भीती वाटत होती. त्याचा मेल पाहिल्यावर मला जुने दिवस पुन्हा आठवले. मी हॅरीला किती दु:ख दिले आहे, याची जाणीव झाली, असे ती महिला म्हणाली.

माझ्या चुकीमुळे हॅरीला असुरक्षित वाटू लागले आहे. मी त्याच्या विश्वासाच्या लायक नाहीय, परंतू मला त्याच्या विश्वासाची गरज आहे. भविष्यात मी त्याला अशाप्रकारचा कोणताही त्रास होऊ देणार नाही, असे या महिलेने सांगितले.

शेवटी महिलेने लिहिले की, जे काही झाले त्यावरून तिसरे मुल हे काही समस्येचे निराकरण होऊ शकत नाही. जशी मी दोन वर्षांपूर्वी होते तशी आता नाहीय. आता मी त्याला कधीही धोका देणार नाही. मी नेहमी त्याचवर प्रेम करेन. यासाठी मला तिसऱ्या मुलाच्या जबाबदारीत बांधण्याची आवश्यकता नाहीय. (सर्व फोटो : पिक्साबे)