Teddy Day : प्रेम आणखी फुलवायचं असेल तर राशीनुसार पार्टनरला द्या टेडी, मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 12:00 PM2020-02-10T12:00:50+5:302020-02-10T12:05:52+5:30

गोंडस टेडी बिअर पाहून सगळ्यांनाच आनंद होतो. आज व्हॅलेंटाईन वीकचा चौथा दिवस म्हणजेच टेडी डे आहे. अनेकजण आपल्या पार्टनरचा राग घालवण्यासाठी टेडी बिअर गिफ्ट देतात. प्रेम आणखी फुलवायचं असेल तर राशीनुसार पार्टनरला कोणत्या रंगाचा टेडी द्यायचा हे जाणून घेऊया.

लाल रंग हा प्रेमाचं प्रतिक मानला जातो. मेष आणि सिंह राशीच्या पार्टनरला लाल रंगाचा टेडी द्या.

मकर आणि वृश्चिक राशीच्या पार्टनरला निळ्या रंगाचा टेडी देणं शुभ मानलं जातं.

गुलाबी रंगाचा टेडी हा धनू आणि मीन राशीच्या पार्टनरला दिल्यास नातं अधिक घट्ट होईल.

प्रेमात आदर हवा असेल तर सिंह राशीच्या पार्टनरला हिरव्या रंगाचा टेडी गिफ्ट करा.

पांढऱ्या रंगाचा टेडी हा तूळ राशीच्या पार्टनरला नक्की द्या.

मकर आणि सिंह राशीच्या पार्टनरला पिवळ्या रंगाचा टेडी द्या म्हणजे नात्यातील गोडवा टिकून राहील.

काळ्या रंगाचा टेडी हा कोणत्याही राशीच्या पार्टनरला गिफ्ट करू नका.