'या' मोठ्या देशात सेक्सपासून दूर राहतायत लोक; पण का? कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 07:50 PM2021-11-17T19:50:36+5:302021-11-17T19:59:39+5:30

सर्वेक्षणात सुमारे 30 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनी कमीत कमी एक वर्षापासून सेक्स केलेला नाही.

अमेरिकेतील (America) लोकांमध्ये सेक्स करण्याची इच्छा सातत्याने कमी होत चालली आहे, असा खुलासा एका अभ्यासातून समोर आला आहे. या अहवालानुसार, अमेरिकन लोकांची सेक्समधील आवड खूपच कमी झाली आहे. विशेषतः कॅज्युअल सेक्समध्ये. (Sex depression in america)

सर्वेक्षणात सुमारे 30 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनी कमीत कमी एक वर्षापासून सेक्स केलेला नाही. संशोधकांनी हे अध्ययन नॅशनल सर्व्हे ऑफ फॅमिली ग्रोथ डेटाच्या आधारे 2011 ते 2019 दरम्यान अमेरिकन युवकांच्या सेक्सुअल हॅबिटची तुलना करून केले आहे.

काय सांगतो अध्ययन? डेटानुसार, अमेरिकेतील युवक कमी सेक्स करत आहेत. जोडीदारासोबत राहूनही ते शारीरिक संबंधात रस दाखवत नाहीत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या अनेक महिलांनी अनेक वर्षांपासून सेक्स केलेला नाही.

तथापि, अहवालात असेही आढळून आले आहे की, जोडीदारासोबत राहणारे अथवा विवाहित लोकांच्या तुलनेत, एकटे राहणाऱ्यांमध्ये सेक्सशिवाय राहणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या विवाहितांपैकी केवळ पाच टक्के लोकांनी या वर्षी लैंगिक संबंध न ठेवल्याचे सांगितले.

अध्यनातून समोर आले की, 2011 नंतर, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणांची संख्या 40 टक्क्यांवरून 32 टक्क्यांवर आली आहे. विवाहित लोकांना लैंगिकदृष्ट्या सक्रिय मानले जाते. परंतु सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, लग्नाला उशीर झाल्याने लोकांचा सेक्समधील रस कमी होत चालला आहे.

विशेषतः महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होत आहे. अहवालात असे म्हटले गेले आहे की, 'दर चार अमेरिकन महिलांपैकी एका महिलेने दोन वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळांपासून सेक्स केलेला नाही.

सर्वेक्षणातील सर्वात आश्चर्याची गोष्ट 25 वर्षांवरील वयोगटातील महिलांमध्ये दिसून आली. काही वर्षांपूर्वी लैंगिकदृष्ट्या सक्रिय असूनही, वीसपैकी एका महिलेला सेक्स करून 10 वर्षे अथवा त्याहून अधिक दिवस झाले आहेत.

कोरोना आणि त्यानंतरच्या काळात लोकांच्या लैंगिक जीवनात मोठे बदल झाले आहेत. या महामारीच्या काळाचा लोकांच्या लैंगिक जीवनावरही मोठा परिणाम झाला आहे, असेही या अभ्यासातून समोर आले आहे.

सेक्सपासून का दूर राहतायत लोक? - अमेरिकन समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ तरुणांची लैंगिक इच्छा कमी होण्याचे कारण शोधण्यासाठी अनेक वर्षांपासून संशोधन करत आहेत. स्कॉट साउथ आणि लेई लेई यांनी त्यांच्या एका अभ्यासात अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. जसे की, दीर्घकाळ रिलेशनशीप न राहणे, लग्नापासून किंवा इतर सामाजिक चालीरीतींपासून दूर राहणे, सोशल मीडियाचा अतिवापर, अति मद्यपान, व्हिडिओ गेम्सचे व्यसन, पोर्नोग्राफी सारख्या गोष्टीही लैंगिक जीवनावर विपरित परिणाम करतात.

तज्ज्ञांच्या मते, कोरोनामुळे आयसोलेशनमध्ये राहिल्यामुळे या सवयींना आणखी वाढल्या आहेत. एकांतात राहण्याची सवयही लोकांमध्ये वाढत आहे. या सर्व गोष्टी तरुणांमधील सेक्सची इच्छा कमी करण्याचे काम करत आहेत. (सर्व फोटो - प्रतिकात्मक)