Relationship: पती वेगळा झाला, पण कारण न सांगता; आठ महिन्यांनी काकीने 'टॅग' केले अन् बिंग फुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 03:57 PM2021-07-28T15:57:01+5:302021-07-28T16:07:35+5:30

Relationship Breakup, divorce reason, Husband Exposed: एका महिलेने रिलेशनशिप पोर्टलवर पतीसोबतच्या आपल्या नात्याबाबत अशी बाब सांगितली आहे जी कोणाचेही डोळे खाडकन उघडू शकते. मात्र, नाओमी नावाच्या या महिलेला विभक्त झाल्यावर हे गुपित अशावेळी समजले. तोवर वेळ गेल्याने आता तिला पश्चाताप होत आहे. नाओमीसोबत असे काय घडले चला पाहुया.

एका महिलेने रिलेशनशिप पोर्टलवर पतीसोबतच्या आपल्या नात्याबाबत अशी बाब सांगितली आहे जी कोणाचेही डोळे खाडकन उघडू शकते. मात्र, नाओमी नावाच्या या महिलेला घटस्फोट झाल्यावर हे गुपित अशावेळी समजले. तोवर वेळ गेल्याने आता तिला पश्चाताप होत आहे. नाओमीसोबत असे काय घडले चला पाहुया. (husband affaire exposed from Facebook after 8 months.)

नाओमीने लिहिले की, एक दिवस मी बसलेली असताना माझ्या फोनवर फेसबुकचे नोटिफिकेशन आले. माझे एक्स पती डेविड यांच्या काकी लिज यांनी एका पोस्टमध्ये दोघांना टॅग केले होते. यामध्ये तिने शुभेच्छा दिल्या होत्या. घटस्फोट घेऊन 8 महिने झाले होते, यामुळे या गोष्टीसाठी शुभेच्छा देणे थोडेसे विचित्र वाटले. या पोस्टमध्ये जे लिहिले होते, ते वाचून मी हैरान झाले.

लिज हिने छोटा मुलगा मॅक्सचे या जगात स्वागत करत भाच्याला भेटण्यासाठी आतूर असल्याचे म्हटले होते. बाळाची आई आणि बाळ दोन्ही सुखरुप असल्याचे म्हटले होते. बाळाचे डोळे आणि नाक त्यांच्या कुटुंबावरच गेली आहे., असे त्यात लिहिले होते. नाओमीला सुरुवातील चुकून टॅग केले असावे असे वाटले.

काही वेळाने लिजने ती पोस्ट एडिट केली. पोस्ट तशीच होती, त्यातून माझे नाव काढून टाकले. डेविडचे नाव तसेच होते. यामुळे मला संशय आला म्हणून मी त्या पोस्टची स्क्रीनशॉट काढला आणि मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला. याचा काय अर्थ असू शकतो, असे मी विचारले, असे नाओमी म्हणाली.

माझ्या एका मित्राने म्हटले की डेविडचे मुल असू शकते. हे ऐकताच मला चक्कर आल्यासारखे वाटले. आठ महिन्यांआधीचे सारे आठवू लागले. डेविडने म्हटलेले की त्याचे आता प्रेम नाही राहिले. आमचे नाते पूर्वीसारखे राहण्यासाठी मी खूप प्रयत्न केले परंतू त्याचा फायदा झाला नाही. अखेर त्यांने म्हटले की आपण वेगळे झालेले चांगले.

गेले वर्ष आमच्यासाठी खूप वाईट गेले. डेविडच्या आईचे निधन झाले होते. यानंतर काही दिवसांतच माझा गर्भपात झाला. मुल गमावल्याचे दुख: मला सहन होत नव्हते. मला वाटले मी खूप दिवस उदास आणि त्याच्याशी लांब राहत असल्याने त्याच्या मनातून उतरले असेल असे वाटले होते. असे ती म्हणाली.

मी त्याला कोणत्यातरी तज्ज्ञाकडे जाण्यासाठी बोलले होते. परंतू डेविडने वेगळे होण्याचे ठरविले होते. शेवटी आम्ही आमचे घर भाड्याने देऊन तेथून निघालो. डेविडने सामान ठेवण्यास मदत केली आणि जाताना मीठी मारून आपले नाते चांगले करू शकलो नाही म्हणून माफी मागितली, असे नाओमीने म्हटले.

नवीन घरात शिफ्ट झाल्यानंतर मानसिक स्थिती सुधारण्यासाठी मी थेरपिस्टकडे जात होते. तेव्हा एकदाच मी डेविडला त्याच्या ऑफिसबाहेर पाहिले होते. काही संपर्क नव्हता. या साठी मी स्वत:लाच दोषी मानत राहिले. परंतू काकी लिजची पोस्ट वाचल्यानंतर लफडे काही वेगळेच असल्याचे वाटू लागले, असे नाओमीने सांगितले.

काकीला मी चॅटिंगवर याबाबत विचारले परंतू तिचे काहीच उत्तर आले नाही. खरेतर तिला माहिती नव्हते की मी आणि डेविड वेगळे झालो. अधिक चौकशी केल्यावर समजले की, डेविड मेरी नावाच्या महिलेसोबत राहत आहे. आम्ही वेगळे झाल्याच्या आठ महिन्यांनी त्याला मुल झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून माझ्या मनात राग आहे. मला डेविडकडून उत्तर हवे आहे. त्याने माझी माफी मागायला हवी. कारण माझ्या घटस्फोटाआधीपासून त्यांचे लफडे सुरु होते. मेरीला त्याचे लग्न झाल्याचे माहिती होते, तरीही तिने त्याच्याशी संबंध ठेवले, असे आरोप नाओमीने केले.

नाओमीने म्हटले की, पोर्टलवर डेविड आणि मेरीचे नाव सार्वजनिक करण्याचा उद्देश हा आहे की, त्यांचे नातेवाईक आणि मित्रांसमोर त्यांचे भांडे फुटावे. त्यांनी माझ्यासोबत जे केले ते समजावे. डेविडने आता एकतर माझा सामना करावा किंवा घटस्फोटासाठी कोर्टात भेटावे, त्याचा चेहरा त्याला दाखवायचा आहे.