बॉयफ्रेंडला आधी ठेवले 'प्रोबेशन'वर, एका महिलेची अनोखी 'लव्ह स्टोरी'!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 03:15 PM2021-02-09T15:15:09+5:302021-02-09T15:31:30+5:30

यूकेच्या एका महिलेने आपल्या बॉयफ्रेंडची टेस्ट घेण्यासाठी लॉकडाउनचा वेळ कसा वापरला, याबद्दल तिने रिलेशनशिप पोर्टलला सांगितले. ती आणि जॉर्ज काही वर्षांपूर्वी टिंडरवर भेटले होते. त्यावेळी ही महिला 16 वर्षांची होती. आता एप्रिलमध्ये ते त्यांच्या लव्ह स्टोरीचे सहावे वर्ष साजरे करतील.

दोघांचे नातं पूर्वीपेक्षा खूपच मजबूत बनलं आहे, असे महिलेने सांगितले. तिने लोकांसोबत एक खास सीक्रेट शेअर केले आहे आणि हा तसाच फंडा आहे की, जसे काहीतरी वस्तू खरेदी करण्यापूर्वी ती ट्राय करून पाहण्यासारखे आहे.

महिलेने सांगितले की, "टीनएज रोमांसमध्ये आम्ही दोघे बहुतेक वेळेस एकमेकांपासून खूप दूर राहायचो. इंजिनीअरिंगचा अभ्यास करण्यासाठी जॉर्ज स्टॅफोर्डशायरला गेला होता. 2 वर्षानंतर मी सुद्धा माझा भूगोलचा अभ्यास करण्यासाठी मँचेस्टरला गेले. आमच्या दोघांसाठीही हे अवघड होते, पण काहीही करून वीकेंडला आम्ही एकमेकांना भेटायचो. आम्ही जेव्हा भेटलो, तेव्हा क्लब मित्रांसह खेळण्यासाठी जात होतो."

याचबरोबर महिलेने लिहिले की, "2019 मध्ये जॉर्जला दुसर्‍या शहरात नोकरी मिळाली आणि वारंवार प्रवास करावा लागला. आमच्यात अंतर वाढत होतं पण आम्ही आमचा लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. मीसुद्धा एका ठिकाणी अर्धवेळ नोकरी सुरू केली. मार्च 2020 मध्ये कोरोनाव्हायरसमुळे क्लासेस ऑनलाइन सुरू झाले."

"मी जॉर्जला भेटाण्यासाठी त्याच्या शहरात गेले होते आणि मँचेस्टरला परत येण्यासाठी ट्रेन पकडणार होती, तेवढ्यात मला कॉल आला की, कंपनीने मला अर्धवेळ नोकरीवरून काढून टाकले. त्यानंतर रूमचे भाडे, कपडे खरेदीसाठी पैसे आणि माझ्या महिन्याचा खर्च काढायचा, याबाबत मला काहीच समजत नव्हते."

"मी माझ्या शहरात परतले. येथे लॉकडाउन सुरू झाले. माझ्या समस्या पाहून जॉर्जने मला काही दिवस आपल्यासोबत राहण्याची ऑफर दिली. हे ऐकून मी घाबरून गेले कारण एका आठवड्यापेक्षा जास्त काळ मी त्याच्याबरोबर कधीच राहिली नाही. आम्ही दोघांनी बराच वेळ एकमेकांपासून दूर राहून घालवला आहे. अखेरीस मी त्याच्या दोन खोल्यांच्या लहान फ्लॅटमध्ये राहायला आली."

"जॉर्ज मला पैशासाठी मदत करू पाहत होता, पण मी त्यासाठी तयार नव्हते. मला त्याच्यावर ओझं व्हायचे नव्हते आणि मला त्याला माझा खर्च सांगायचा नव्हता. याशिवाय, भांडी धुणे, साफसफाई करणे, बाथरून साफ करणे यासारख्या गोष्टी कशा मॅनेज होतील, याचा विचार करून मी अस्वस्थ झाले होते."

"शेवटी मी जॉर्जसोबत काही दिवस राहण्याचा निर्णय घेतला. मी म्हटले आहे की, माझ्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेपर्यंत मी इथेच राहीन आणि त्यानंतर मी जॉर्जसोबत कायमची राहू शकेन की नाही, याबाबत निर्णय घेईन."

या महिलेने लिहिले की, "आपल्या आजीवन वचनबद्धतेची टेस्ट घेण्यासाठी यापेक्षा चांगला काळ नव्हता. आभारी आहे की, माझ्या सर्व समस्या लवकरच दूर झाल्या. आम्ही एकत्र मिळून घरातील कामे वाटून घेतली. तो स्वयंपाक बनवतो, मी भांडी धुते, तो लादी पुसतो, मी साफसफाई करते. तो कचरा बाहेर ठेवतो, मी वॉशरूम साफ करते."

"कोरोनाचे संकट वाढले आणि कुटुंबियांच्या आरोग्याबद्दल मला खूप काळजी वाटली. मी माझ्या घरापासून दूर असल्याने जॉर्ज मला भावनिकदृष्ट्या खूप पाठिंबा देत होता. त्याच्यासोबत राहून मला थोडासा कमी तणाव वाटत होता. मला या गोष्टीची खूप गरज होती."

"प्रत्येकवेळी एकत्र राहणे, एकत्र खरेदी करणे आणि घरातील सर्व कामे एकत्र काम करणे हे माझ्या नव्या सामान्य जीवनाचा एक भाग बनले होते.याशिवाय, मी आता माझ्या आयुष्याविषयी विचारही करू शकत नव्हते."

शेवटी या महिलेने लिहिले आहे की, "अशा प्रकारे 11 महिने झाल्यानंतर आता मी त्याच्यापासून विभक्त होण्याचा विचारही करू शकत नाही. मी माझा अभ्यास पूर्ण केला आहे आणि मला येथे अर्धवेळ नोकरी देखील मिळाली आहे. एकंदरीत, मी आनंदाने असे म्हणू शकतो की जॉर्जने आपला प्रोबेशन पूर्ण केली आहे."