Relationship: पतीच्या बेस्ट फ्रेंडवर पत्नीचे मन जडले; पतीने असे काही केले, तिघेही एकत्र रहायला लागले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 11:03 AM2021-07-11T11:03:02+5:302021-07-11T11:09:21+5:30

Pati Patni Aur Wo: लग्नानंतर पती-पत्नीमध्ये सिक्रेट असे काही राहत नाही. असेच एक सिक्रेट कॅटीने जस्टिनला सांगितले. ते ऐकून जस्टिनला धक्काच बसला.

पती, पत्नी और वो ची प्रकरणे तुम्ही अनेकदा ऐकली असतील. आजुबाजुला, पाहुण्यांच्यात असे प्रकार झाले देखील असतील. मात्र, अमेरिकेच्या सिएटलमध्ये असा प्रकार समोर आला आहे की, वाचून हैराण व्हाल.

लग्नानंतर जेव्हा पतीला समजले की पत्नीचे दुसरीच बरोबर अफेअर आहे, तेव्हा त्या पतीने पत्नीला ती तरुणी गिफ्ट म्हणून दिली. आता तिघेही सुखाने संसार करत आहेत. चला जाणून घेऊया त्यांचा संसार करा सुरु आहे...

अमेरिकेच्या या जोडप्याची प्रेम कहानी कॉलेजमधून सुरु झाली होती. पती जस्टिन हा कॉमेडियन आहे. 2006 मध्ये एका शोदरम्यान त्याची ओळख रियल इस्टेट असोसिएट कॅटी रुपल सोबत झाली. पुढे प्रेम झाले आणि बरीच वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केले.

2013 मध्ये या दोघांनी लग्न केले. असे म्हणतात की, लग्नानंतर पती-पत्नीमध्ये सिक्रेट असे काही राहत नाही. असेच एक सिक्रेट कॅटीने जस्टिनला सांगितले. ते ऐकून जस्टिनला धक्काच बसला.

कॅटीने सांगितले की, ती बायसेक्स्युअल आहे आणि तिला ते रिलेशन तसेच ठेवायचे आहे. यानंतर तिने जस्टिनची खास मैत्रीण क्लेअरबाबत बोलायला सुरुवात केली. तेव्हा तर जस्टिनचे डोळे पांढरे व्हायचे राहिले होते. त्याच्या पत्नीची 'ती' दुसरी तिसरी कोणी नाही तर त्याचीच बेस्ट फ्रेंड होती.

क्लेअरला तिने सोशल मीडिया अकाऊंटवर पाहिले होते, तेव्हा तिच्याकडे आकर्षित झाल्याचे जस्टिनला कॅटीने सांगितले.

जस्टिनने सांगितले की, क्लेअर ही ३६ वर्षांची आहे, आणि कॉलेजपासूनची मैत्रिण आहे. जस्टिनची पत्नी क्लेअरवर प्रेम करतेय असे समजताच तो थेट क्लेअरला भेटायला गेला. पत्नीसमोर बसवून तिच्याशी चर्चा केली.

क्लेअरने सांगितले की, जेव्हा जस्टिन आणि त्याची पत्नीने माझ्याशी या विषयावर चर्चा केली तेव्ही मी खूप सरप्राईज झाले. मला तरुण आणि तरुणी दोन्ही आवडत असल्याने सोबत राहण्यास तयार झाले.

तिघांच्या म्हणण्यानुसार पॉलिअमोरोस रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी टीम वर्क आणि कम्युनिकेशन चांगले असायला हवे, जर तिघांपैकी कोणालाही कोणत्याही गोष्टीवरून जळत असल्यास किंवा खटकत असल्यास आपापसात चर्चा करतो आणि प्रश्न सोडवतो.

या निर्णयामुळे घरातल्यांना काहीच प्रॉब्लेम आला नाही. परंतू, ऑनलाईन ट्रोल व्हावे लागले.

टॅग्स :लग्नmarriage