पार्टनरला क्वालिटी टाईम देता येत नाहीय?, मग हे नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 04:57 PM2018-10-15T16:57:34+5:302018-10-15T17:02:47+5:30

1. फोन डेट : पार्टनरला भेटण्याचा तुमचा प्लान वारंवार रद्द होत असेल तर अशावेळी तुम्ही फोनच्या मदतीनं काम चालवू शकता. याला तुम्ही 'फोन डेट' म्हणू शकता. पण फोन डेटवर असताना तुम्ही दुसरे कोणतेही काम करायचे नाही. संपूर्ण लक्ष फोनवर केंद्रीत करायचे. हवे त्या विषयावर बोला पण वाद होईल, असा संवाद आवर्जून टाळा.

2. शेवटच्या क्षणी प्लान फसवू नका : व्यस्त आयुष्यातून वेळ काढून एकमेकांना वेळ देण्याचा प्रयत्न करा. वेळ निश्चित केल्यानंतर शेवटच्या क्षणी मात्र प्लान रद्द करू नका.

3. वॉक अँड टॉक : पार्टनरसोबत घालवलेला एक-एक क्षण आपल्यासाठी महत्त्वपूर्ण, अनमोल असा असतो. अशातच पार्टनरला आपण कोठे, केव्हा आणि कधी भेटतोय, याला जास्त महत्त्व नसते. महत्त्वाचा असतो तो फक्त वेळ. जर तुमच्याकडे डेटसाठी वेळ नाही, तर कधी कधी येता-जात अर्ध्या तासांसाठी वॉकसाठी जाऊन दिवसभरातील महत्त्वाच्या गोष्टी एकमेकांसोबत शेअर करा.

4. एकत्र घराबाहेर पडा : जर तुमचा पार्टनर काही कामानिमित्त बाहेर जात असेल किंवा खरेदीसाठी जात असेल तर घरात बसण्याऐवजी आपल्या पार्टनरसोबत घराबाहेर पडा. या बहाण्यानं तुम्हाला एकत्रितरित्या प्रचंड वेळ मिळेल. तुमचं कामदेखील होईल आणि पार्टनरसोबत वेळदेखील मिळेल.

5. कपल मसाज घ्या : कपल मसाजचा प्लान करा आणि शारीरिक-मानसिक थकवा दूर पळवा. मसाजदरम्यान तुम्हाला पार्टनरसोबत राहताही येईल, गप्पादेखील मारता येतील.