Google सर्च केल्यानं बॉयफ्रेंडचा कारनामा उघड; टिकटॉक फेम प्रिसच्या पायाखालची जमीनच सरकली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 08:40 AM2021-08-10T08:40:10+5:302021-08-10T08:47:20+5:30

प्रेमात कधी धोका मिळेल सांगता येत नाही. अनेक वर्ष साथ देऊनही कधी कधी तुम्ही तुमच्या पार्टनरला पूर्णपणे ओळखत नाही. तसेच डोळेबंद करून विश्वास करत असल्यानं नातं पुढे टिकून राहतं. विश्वासघात करणाऱ्याची नियत कशी आहे हे सहसा कळत नाही. असाच काहीसा प्रकार अमेरिकेतील प्रसिद्ध टिकटॉक यूजर प्रिससोबत घडला. प्रिसला गुगलच्या माध्यामातून तिच्या बॉयफ्रेंडचा खरा चेहरा समजला.

प्रिसने सोशल मीडियावर सांगितले की, ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत गेल्या दीड वर्षापासून रिलेशनमध्ये आहे. दोघं नेहमी बाहेर फिरायला जात होते. एकदा हे दोघंही हॉलिडेसाठी गेले होते तेव्हा तिच्या बॉयफ्रेंडचा मोबाईल कुठेतरी हरवला. त्यानंतर काही अशा घटना घडल्या ज्यामुळे प्रिसला तिच्या बॉयफ्रेंडवर संशय येऊ लागला.

सुट्टीहून परतल्यानंतर प्रिसचं बॉयफ्रेंडसोबत संपर्क होत नव्हता. काही दिवस वाट पाहिल्यानंतर प्रिस तिच्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली परंतु तिथे कुणीच नव्हतं. बॉयफ्रेंडचं सोशल मीडिया अकाऊंटही नव्हतं. ६ महिने वेळ गेल्यानंतरही प्रिसचा थांगपत्ता नव्हता. तेव्हा एकेदिवशी तिने गुगलवर त्याचे नाव सर्च केले.

प्रिसने व्हिडीओत म्हटलं की, मला आधीपासून माहिती होतं त्याचं कोणतंही सोशल मीडिया अकाऊंट नाही. फोन लागत नव्हता आणि घराला टाळा होता. अखेर गुगलवर त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी जे पाहिलं त्यावर माझ्या डोळ्यांनी विश्वास ठेवला नाही. त्याचं नाव एका मुलाच्या रजिस्ट्रीमध्ये होतं. त्याचा ६ महिन्याचा मुलगा होता.

गुगलवर त्याचं नाव पाहून मी हैराण झाले. दुसऱ्या शहरात राहणाऱ्या एका मुलाच्या वडिलांचे नाव म्हणून दिसलं. मला वाटलं हा फक्त योगायोग नाही. माझ्या बॉयफ्रेंडचं नाव खूप वेगळं होतं. त्याच्या नावाची व्यक्ती माझ्या शहरापासून इतक्या जवळ राहत असेल याची शक्यताही कमी होती.

अखेर एका मित्राच्या मदतीनं प्रिसने त्या मुलाच्या आईचं नाव इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंट शोधून काढलं. अकाऊंट शोधताच प्रिसचा संशय खरा ठरला. त्या मुलाच्या आईसोबत तिच्या बॉयफ्रेंडचे अनेक फोटो सापडले. तिचा बॉयफ्रेंड मुलाला हातात घेऊन खूप आनंदात फोटो काढत होता.

तो मुलगा ६ महिन्याचा होता आणि प्रिसचा बॉयफ्रेंड तिच्यापासून ६ महिने दूर होता. मुलाच्या आईच्या अकाऊंटवरून अखेर प्रिसने तिच्या बॉयफ्रेंडचंही एक सोशल मीडिया अकाऊंट असल्याचं माहिती पडलं. जे तिला याआधी माहिती नव्हतं.

प्रिसने मुलाचे आणि आईचे अनेक फोटो तिच्या बॉयफ्रेंडला पाठवले. त्यानंतर बॉयफ्रेंडनं प्रिसला ब्लॉक केले. त्यानंतर प्रिसने मुलाच्या आईसोबत संपर्क साधला आणि तिला सर्व काही सांगितले. प्रिसने तिच्याशी बोलल्यानंतर मला सर्व गोष्टी उलगडल्या असं म्हटलं.

तो एकाचवेळी आम्हा दोघींना डेट करत होता. जेव्हा काही महिन्यांनी दुसरी महिला गरोदर झाली तेव्हा तो मला सोडून निघून गेला. प्रिसनं सांगितले, भलेही माझ्या बॉयफ्रेंडसोबत माझं बोलणं झालं नाही परंतु मुलाच्या आईसोबत बोलणं झाल्यानं मला समाधान वाटत होते.

मुलाच्या आईशी बोलल्यानंतर मला बरं वाटलं. अखेर मला सत्य कळालं त्यानंतर मला पुढे काय करायचं हे स्पष्ट झालं. बॉयफ्रेंडनं विश्वासघात केल्यानं मी दु:खी होते. कुणीही बॉयफ्रेंडच्या सीक्रेट लाइफबाबत जाणून घेणार नाही परंतु त्या महिलेसोबत बोलणं झाल्यानं मनावरील भार हलका झाला.