बॉयफ्रेन्डची अजब सेक्शुअल कंडीशन खरी की खोटी? वैतागलेल्या महिलेने सांगितला विचित्र अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 06:17 PM2021-08-16T18:17:01+5:302021-08-16T18:36:07+5:30

लिव्ह इनमद्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या बॉयफ्रेन्डच्या एका अजब सेक्शुअल कंडीशनचा खुलासा सोशल मीडियावर केला आहे.

एकमेकांवर किती प्रेम आहे हे जाणून घेण्यासाठी कधी-कधी कपल्स लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. सोबत राहिल्यावर पार्टनर चांगल्या-वाईट सवयी जास्त समजतात. लिव्ह इनमद्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या बॉयफ्रेन्डच्या एका अजब सेक्शुअल कंडीशनचा खुलासा सोशल मीडियावर केला आहे. महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर सेक्स अॅन्ड रिलेशनशीप एक्सपर्टकडे सल्लाही मागितला आहे.

महिलेने लिहिले की, 'माझ्या बॉयफ्रेन्डसोबत मी गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. कोरोना काळात त्याची नोकरी गेली, घरातील लोक आजारी पडले आणि त्याच्या काकीचा मृत्यूही झाला. या सगळ्या गोष्टींमुळे तो बिथरला होता. त्याला सांभाळण्यासाठी मी त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही गेल्या ४ महिन्यांपासून लिव्ह इनमध्ये राहतो. आमचं नातं शानदार होतं. मानसिक आणि शारिरिक रूपाने आम्ही दोघे एकमेकांसाठी परफेक्ट होतो. पण गेल्या काही महिन्यात काही गोष्टीमुळे मी हैराण झाली आहे'.

'गेल्या काही दिवसांपासून माझ्या बॉयफ्रेन्डच्या सेक्शुअल बिहेविअरमध्ये एक बदल आला आहे. तो झोपेत शारीरिक संबंध ठेवतो आणि सकाळी झोपेतून उठल्यावर त्याला काहीच लक्षात राहत नाही. इंटरनेटवर आम्ही वाचलं की, 'सेक्सोमेनिया' नावाचा एक आजार असतो. ज्यात रूग्ण झोपेत शारीरिक संबंध ठेवतो आणि याबाबत रूग्णाला काहीच माहीत नसतं. याला स्लीप सेक्सही म्हटलं जातं'.

'मी बॉयफ्रेन्डला बरंच समजावलं की, मी झोपेत विना प्रोटेक्शन संबंध ठेवू शकत नाही आणि तो जर माझ्या मर्जी विना काही करत असेल तर मी त्याला सोडून जाणार. त्याने मला विश्वास दिला की, आता तो असं काही करणार नाही. पण या गोष्टींचा काही फरक पडला नाही आणि तो अर्ध्या रात्री उठून तेच करू लागला. अर्थात त्याला लक्षात नसेल की, झोपण्यापूर्वी आम्ही काय बोललो. तो फार लवकर झोपतो आणि मग त्याचा सेक्सोमेनिया जागा होतो'.

'बऱ्याच भांडणानंतर अखेर आम्ही संबंध ठेवणंच बंद केलं. मी म्हणाले की, जोपर्यंत तो याबाबत डॉक्टरसोबत बोलत नाही. तोपर्यंत आपल्यात काहीच फिजिकल होणार नाही. त्याने मला माफी मागितली आणि म्हणाला की, तो स्वत:वर कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करेल. तसेच डॉक्टरलाही भेटेल. इतकं सगळं होऊनही काहीच ठीक झालं नाही. अखेर मी माझी रूम बदलली. सकाळी तो म्हणाला की, त्याला याबाबत डॉक्टरसोबत बोलण्यास लाज वाटते. म्हणून तो जात नाही'.

'इंटरनेटवर या आजाराबाबत पूर्ण माहिती घेतल्यावर मी त्याच्या डाएटमध्ये बदल केला. त्याला दारू आणि तणावापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचाही काही फायदा झाला नाही. अखेर एका रात्री मी त्याला वाईटपणे बाजूला केलं आणि म्हणाले की, जर तो माझ्यासोबत आला नाही तर मी ब्रेकअप करणार. हैराण करणारी बाब म्हणजे दुसऱ्या दिवसापासून त्याचा सेक्सोमेनिया अचानक बंद झाला'. (प्रातिनिधिक छायाचित्र)

'मला माहीत आहे की, मला या गोष्टीसाठी आनंदी व्हायला पाहिजे. पण मला फार आश्चर्य वाटत आहे की, असं कसं झालं. सतत माझ्या डोक्यात तोच विचार येतो. माहीत नाही का पण मला त्याचा आजार खोटा होता असं वाटतं. तो नाटक करत झोपेत माझ्यासोबत माझ्या मर्जीविना संबंध ठेवत होता आणि असं दाखवत होता की, त्याला काहीच आठवत नाही. जेव्हा त्याचा सेक्सोमेनिया बंद झाला तेव्हा आमचं सामान्य लैंगिक जीवनही आधीसारखं नव्हतं. याचं मला फार दु:खं वाटतं'.

'माझ्या मनात पुन्हा पुन्हा विचार येतात की, ज्या व्यक्तीवर मी इतकं प्रेम केलं तो सहमतीने संबंध ठेवणं टाळण्यासाठी माझ्या खोटं स्लीप डिसऑर्डरचं नाटक केलं. सर्वात मोठी बाब म्हणजे जशी मी त्याला सोडण्याची धमकी दिली त्याचा आजार अचानक बरा झाला'.

महिलेने शेवटी लिहिलं की, 'मी विचार करते की, बॉयफ्रेन्डसोबत यावर शांततेने बसून बोलेल, पण नंतर हा विचार करून थांबते की, त्याला असं वाटेल की, मी त्याच्यावर खोट्या आजाराचा आरोप लावते. मी या गोष्टी डोक्यातून बाहेरच काढू शकत नाहीये. ज्याचा माझ्या रिलेशनशिवर प्रभाव पडत आहे. कृपया मदत करा'. (प्रातिनिधिक छायाचित्र)

रिलेशनशिप एक्सपर्टने महिलेला सल्ला दिला की, 'तुमचा बॉयफ्रेन्डवर संशय येणं साहजिक आहे. जर खरंच सेस्सोमेनियाने पीडित असेल तर डॉक्टरांच्या उपचाराशिवाय ठीक होऊ शकत नाही. लिव्ह इन पार्टनर म्हणून तो तुमच्या गरजा आणि गोष्टींना समजून घेत नाहीये. अशात तुम्ही हा विचार करायला पाहिजे की, हे नातं तुम्ही पुढे न्यावं की नाही'.

रिलेशनशिप एक्सपर्टने महिलेला सल्ला दिला की, 'तुमचा बॉयफ्रेन्डवर संशय येणं साहजिक आहे. जर खरंच सेस्सोमेनियाने पीडित असेल तर डॉक्टरांच्या उपचाराशिवाय ठीक होऊ शकत नाही. लिव्ह इन पार्टनर म्हणून तो तुमच्या गरजा आणि गोष्टींना समजून घेत नाहीये. अशात तुम्ही हा विचार करायला पाहिजे की, हे नातं तुम्ही पुढे न्यावं की नाही'.

एक्सपर्ट पुढे म्हणाले की, 'सामान्यपणे सेक्सोमेनिया फार गाढ झोपेत होते. ज्याला स्टेज थ्री स्लीपही म्हटलं जातं. जर तुमचा पार्ट झोपल्यावर लगेच संबंधाचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर संशय घेतला जाऊ शकतो. मुळात सेक्सोमेनिया अचानकपणे बंदही होऊ शकतो. जसे की, दररोज दारू पिणारे लोक अचानक दारू पिणं बंद करतात. हेच सेक्सोमेनियाबाबत आहे. पण धमकी दिल्यावर अचानक ते बंद होणं प्रश्नात पाडणारं आहे'.

एक्सपर्ट पुढे म्हणाले की, 'तुमच्या बॉयफ्रेन्डला सेक्सोमेनिया आहे की नाही हे केवळ एखादा स्पेशलिस्ट टेस्ट केल्यावरच सांगू शकतो. पण सेक्सोमेनियाला नाटक म्हणून वापरणं काही नवीन नाही. रेपचे अनेक आरोपी आपल्या बचावासाठी सेक्सोमेनिया आजाराचा वापर करतात. आता हे तुमच्यावर आहे की, हे नातं संशयासोबत पुढे न्यायचं आहे का किंवा सगळं काही विसरून नव्याने सुरूवात करायची आहे'.