गर्लफ्रेंडसोबत पहिल्या डेटवर जाताय?; या 5 गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 07:26 PM2019-05-27T19:26:56+5:302019-05-27T19:34:39+5:30

आपल्या फर्स्ट डेसाठी मुलं फार तयारी करत असतात. पहिल्या डेटसाठी कुठे भेटायचं? रेस्टॉरंटमध्ये जायचं असेल तर ऑर्डर काय करायचं? पार्टनरसोबत काय बोलायचं? तिच्यासाठी काही खास गिफ्ट घेऊन जावं की नाही? या सर्व गोष्टींचा विचार करून, व्यवस्थित प्लॅनिंग करून, त्यानंतरच मुलं डेटवर जातात. पण तरिही काही अशा गोष्टी राहूनच जातात. ज्यांची तयारी न करताच ते मुलीला भेटण्यासाठी निघून जातात. याच छोट्या छोट्या गोष्टीमुळे तुमची डेट खराब होऊ शकते किंवा तुमचं इम्प्रेशन खराब पडू शकतं.

मुलांच्या काही गोष्टींकडे मुली फार बारकाईने लक्ष देत असतात. या गोष्टी नोटीस करताना त्यांना जर थोडीशी जरी कमतरता आढळून आली तर त्या आपला निर्णयही बदलू शकतात. त्यामुळे तुमच्या पदरी निराशा पडू नये म्हणून आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यांच पहिल्या डेटवर मुली बारकाईने निरिक्षण करतात. जर तुम्ही या गोष्टी मॅनेज करण्यासाठी यशस्वी झालात तर तुमची डेट यशस्वी झालीचं म्हणून समजा...

डेटवर गेल्यानंतर फक्त मुलचं मुलींना निरखून पाहत नाहीत तर, मुलीही त्यांना निरखून पाहतात. मुलाने काय वेअर केलं आहे?, कोणत्या प्रकारचं कलर कॉम्बिनेशन आहे?, त्याने केस कसे विंचरले आहेत? या सर्व गोष्टी त्या नोटीस करत असतात. एवडचं नाही तर त्याने जे वेअर केलं आहे, ते तो कॉन्फिडंटली कॅरी करू शकत आहे की, नाही? हेदेखील त्या पाहात असतात.

मुलींना आपल्या आजूबाजूला स्वच्छता फार आवडते. त्या स्वतःच्या शरीरासोबतच त्यांना त्यांच्या आजूबाजूलाही स्वच्छता पाहिजे असते. डेटवर त्या मुलं स्वतःकडे कितपत लक्षं देतात. हायजिनबाबत ते कितपत पर्टिक्युलर आहेत, याकडेही त्या नीट लक्ष देतात. त्यामुळे डेटवर जाताना या गोष्टी तुम्हीही लक्षात घ्या.

पहिल्या डेटवर जर मुलाने आपलं लक्ष व्यवस्थित ठेवलं नाही तर तुमची डेट वाया गेलीच म्हणून समजा. बोलताना मुलगा कुठे पाहतोय? याकडे त्या आवर्जुन लक्ष देतात. त्यामुळे तुमची डट पार्टनर कितीही सुंदर दिसत असली तरिही तिच्याशी बोलताना तिच्याशी आय कॉन्टॅक्ट नक्की ठेवा.

पहिल्या डेटवर मुलाने काय ड्रेसिंग केलं आहे, यासोबतच त्याने पायात काय वेअर केलं आहे? याकडेही मुलींचं व्यवस्थित लक्ष असतं. एवढा सेन्स तर सर्वांनाच असतो. त्यामुळे व्यवस्थित स्वच्छ केलेले शूज वेअर करूनच डेटवर जा.

रेस्टॉरंटच्या वेटरपासून इतर कोणत्याही व्यक्तीशी तुम्ही कसे बोलत आहात, याकडेही त्या व्यवस्थित लक्ष देत असतात. जर तुम्ही इतराशीही आदराने बोलत असाल तर या गोष्टीचं पॉजिटिव इम्प्रेशन पडतं. पण जर पहिल्याच डेटवर एखाद्या गोष्टीचा रागराग केलात तर मात्र तुमचं इम्प्रेशन वाइट पडू शकतं.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआदी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.