परीक्षेच्या काळात अभ्यासासोबत 'या' गोष्टीकडे द्या लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 06:36 PM2020-02-02T18:36:51+5:302020-02-02T19:12:45+5:30

मुलांच्या परीक्षा जवळ आल्या की मुलांपेक्षा त्यांच्या पालकांनाच त्याचं जास्त टेन्शन असतं. परिक्षेच्या काळात फक्त अभ्यासच नाही तर अभ्यासासोबत इतरही अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं असतं ते जाणून घेऊया.

परीक्षेच्या काळात मुलांवर अधिक ताण असतो. मुलांशी मोकळेपणाने संवाद साधून पालकांनी तो ताण हलका करावा. तसेच एखादा विषय अवघड जात असेल तर तो त्यांना सोप्या भाषेत समजून सांगावा.

मुलांचा आहार हा अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र परिक्षेचा काळात त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. मुलांना पोषक आहार द्या.

मुलाच्या आहारात दूध आणि दुधापासून तयार करण्यात आल्या डेअरी प्रोडक्ट्सचा समावेश करा. यामुळे मुलांना अभ्यास करण्यासाठी ऊर्जा मिळेल.

आक्रोड, केळ, ब्रोकली, पालक, मासे अशा पदार्थांमुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच मेंदूचे कार्यही सुरळीत चालते.

परीक्षेच्या काळात फास्ट फूड अथवा जंक फूड खाणं प्रकर्षाने टाळा. शरीराला याचा त्रास होतो. त्यामुळे मसालेदार, तेलकट पदार्थ खाऊ नका.

पाणी पिणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासोबतच मिल्कशेक, ज्यूस, सूप, लस्सी, नारळ पाणी, लिंबू पाणी यासारख्या गोष्टींचं सेवन करा.