मुलांच्या 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पालकांना पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 01:46 PM2020-02-05T13:46:54+5:302020-02-05T14:00:29+5:30

लहान मुलं खूप जास्त मस्ती करतात. तसेच ते इतरांचं अनुकरण देखील करतात. मुलांकडे पालकांचं दुर्लक्ष झालं की मुलांना वाईट गोष्टींची सवय लागते.

मुलं बिघडू नयेत यासाठी त्यांची नीट काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. विविध गोष्टींचा त्यांच्यावर प्रभाव पडत असतो. वाईट गोष्टींपासून मुलांना वेळीच दूर करा.

खेळताना मुलांसोबत अनेक मुलं असतात. अनेकदा त्याचदरम्यान काही वाईट शब्द अथवा भाषा त्यांच्या कानावर पडते. मुलं देखील ऐकून तसंच बोलतात. मुलांनी चुकीचे शब्द उच्चारले तर वेळीच त्यांना रोखा.

काही कारणांमुळे मुलांमध्ये सतत छोटी-मोठी भांडणं ही होत असतात. अनेकदा भांडणाचं रुपांतर पुढे मारामारीत होतं. अशा वेळी मुलांना जवळ घेऊन नीट समजून सांगा.

काही मुलांना दुसऱ्यांना चिडवायला खूप मजा येते. शाळेत अथवा घरी ते चिडवायला सुरुवात करतात. मात्र अशावेळी मुलांना ही गोष्ट चुकीची असल्याचं समजून सांगा.

दुकानात दिसेल ती प्रत्येक वस्तू मुलांना हवी असते. मात्र पालक एखाद्या वेळेस ती वस्तू घेऊन देत नाहीत. अशावेळी मुलं वस्तूसाठी पैसे चोरण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी मुलांना योग्य समज द्या.

विविध गोष्टींचा हट्ट मुलं पालकांकडे करत असतात. मात्र काही वेळा पालक ते हट्ट पूर्ण करत नाहीत. त्यामुळे मुलं रागवतात अथवा रुसून बसतात. त्यावेळी मुलांना काय चांगलं आणि काय वाईट हे सांगा.