२०१९ मध्ये प्रेमाच्या नावाने करा एक संकल्प, 'हे' आहेत काही खास संकल्प पर्याय!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 05:19 PM2018-12-14T17:19:45+5:302018-12-14T17:31:39+5:30

२०१८ हे वर्ष आता सरत आलं आहे. त्यामुळे अनेकजण नव्या वर्षासाठी नव्या संकल्पाचा शोध घेत असतील. तुम्हीही अशाच वेगळ्या संकल्पाच्या शोधात आहात का? दरवर्षी अनेकजण त्यांना असलेली एखादी वाईट सवय सोडण्याचा संकल्प करत असतात. पण यावेळी पार्टनरसोबतचं नातं आणखी चांगलं आणि मजबूत करण्याचा संकल्प का केला जाऊ नये? इतर गोष्टींप्रमाणे ही गोष्टही तितकीच महत्त्वाची आहेच.

तुम्ही जर प्रेमाच्या नात्यात असाल किंवा तुमचं लग्न झालेलं असेल तर या नात्यात ताळमेळ बसवण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पण अनेकदा छोट्या छोट्या भांडणांमुळे नात्यात बराच काळ राहणार उदासीनता येते. त्यामुळे दोघांनीही या नात्याला चांगलं करण्यासाठी काही प्रयत्न करायचे असतात. तुम्हीही यासाठी असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही वेगळे नवीन वर्षांचे संकल्प घेऊन आलो आहोत. याने तुमचं नातं चांगलं आणि आणखी मजबूत होण्यास तुम्हाला मदत होईल.

१) एकत्र करा दुसऱ्यांची मदत - एखादं काम जेव्हा दोघांनी मिळून केलं जातं तेव्हा ते काम लवकर तर होतंच. सोबतच एकमेकांच्या साथीने नातंही घट्ट होतं. कुणाला कोणत्याही प्रकारची मदत करण्यासारखं काम केल्याने दोघांनाही आनंद मिळेल. मग नव्या वर्षात दोघेही एकमेकांना असा आनंद देणार हे ठरवा. (Image Credit : www.videoblocks.com)

२) एकत्र नव्या गोष्टी शिकणार - दोघांच्या काहीना काही शिकण्याची इच्छा असेल जी पूर्ण करु शकले नसतील. मग वाट कशाची बघता? दोघांनी एकत्र तुम्हाला जी गोष्ट शिकायची आहे, त्याचा क्लास सोबत जॉइन करा. एकमेकांच्या गरजा समजून घ्या. स्वत:ही आवडीचं काही शिका आणि जोडीदारालाही शिकवा. असे केल्याने दोघांचाही वैयक्तित विकास होण्यास मदत होईल आणि नातंही चांगलं होईल.

३) एकमेकांना साथ देऊ - चूक कुणाचीही असो, दोघांमध्ये कितीही मोठं भांडण झालं असो पण गरज असेल तेव्हा एकमेकांची ढाल बना. नात्याच्या सुरवातीलाही जोडीदार एकमेकांना वचन देतात. पण पुढे जसजसा वेळ पुढे जातो ही वचने विसरली जातात. नव्या वर्षांना त्यांना पुन्हा जिवंत करा आणि आपल्या जोडीदाराची साथ देण्याचा संकल्प करा.

४) एकमेकांना वेळ देणार - फोनवर मेसेज करणे किंवा बोलणे हे तर एक रुटीन आहे. पण जोडीदारासोबत बसून बोलणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यावर उपाय शोधणे याने नातं आणखी मजबूत होतं. जर तुम्ही जोडीदाराला भेटू शकत नसाल तर त्यांच्याशी समस्येवर व्यवस्थित बोलणं करा. केवळ नावापुरतं बोलू नका.

५) शारीरिक गरजा भागवणार - जोडीदारासोबत नातं आणखी मजबूत करायचं असेल तर दोघांचं लैगिक जीवन सुरळीत करणंही गरजेचं असतं. अनेकदा कामाच्या तणावामुळे अनेकजण लैंगिक जीवनाकडे दुर्लक्ष करतात. पण ही फार महत्त्वाची गरज आहे. त्यामुळे जोडीदाराचा विचार करुन याकडेही लक्ष द्या. लैंगिक जीवन चांगलं असेल तर अर्थातच तुम्हा दोघांनाही आनंद मिळेल.

६) भांडणं निपटवणार - भांडणं होणं हा प्रेमाचाच एक भाग आहे. भांडणांमुळेच हे स्पष्ट होतं की, दोघेही एकमेकांशी जुळलेले आहेत. वेगवेगळ्या रिसर्चमधून हे सिध्द झालं आहे की, ज्या जोडप्यांमध्ये भांडणं होत नाहीत, त्यांचं नातं आतून खिळखिळं झालेलं असतं. त्यामुळे भांडणांचं इतकं टेन्शन घेऊ नका. ते सोडवण्यावर, समजूतदारपणा घेण्यावर भर द्यावा. (Image Credit : Boldsky.com)

७) सोबत एन्जॉय करण्याचं वचन - नात्यात एका काळानंतर एन्जॉयमेंट संपते. त्यांचं लक्ष आयुष्यातील इतर जबाबदाऱ्यांवर जास्त जातं. पण हेही लक्षात ठेवा की, आयुष्य एकच आहे आणि एकदा गेलेली वेळ परत येत नाही. त्यामुळे एकमेकांना वेळ देऊन सोबत एन्जॉय करण्याचा संकल्प करा. बाकीची कामे आयुष्यभर करायचीच आहेत.