Chiplun Flood: देवदूत! दरडींचं संकट ओलांडून NDRF चे जवान चिपळुणात, नागरिकांच्या बचावासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 01:39 PM2021-07-23T13:39:01+5:302021-07-23T13:55:38+5:30

Chiplun Flood: रत्नागिरीत चिपळूण, खेडला मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरानं वेढा घातला आहे. यात हजारो नागरिक अडकून पडले आहेत. त्यांच्या बचावासाठी एनडीआरफचे जवान प्रयत्न करत आहेत. त्याची ही काही छायाचित्र...

रत्नागिरीत सततच्या पावसामुळे वशिष्ठी, जगबुडी नदीला आलेल्या पुरात चिपळूण, खेड परिसराला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी जवळपास १२ फुटांचं पाणी साचलं आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम एनडीआरएफच्या जवानांकडून सुरू आहे.

तब्बल १२ फुटांपर्यंत साचलेल्या पाण्यात एनडीआरएफकडून बोटी आणि लाइफ जॅकेट्सच्या माध्यमातून नागरिकांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कोकणात पोहोचताना एनडीआरएफच्या जवानांना पोहोचण्यासाठी मोठ्या संकटांना सामोरं जावं लागलं. अनेक ठिकाणी दरड कोसळल्यामुळे एनडीआरएफची पथकं चिपळूणमध्ये पोहोचू शकत नव्हती. या सर्व संकटांवर मात करुन एनडीआरएफचे जवान चिपळूणमध्ये पोहोचले आहेत.

रात्रीच्या अंधारातही एनडीआरएफच्या जवानांनी चिपळूणमध्ये बचाव कार्य सुरू ठेवलं

एनडीआरएफची एकूण पाच पथकं चिपळूण, खेडमध्ये दाखल झाली आहेत.

NDRF च्या जवानांनी चिपळूणच्या मिरजोळी गावातले २४ पुरुष, तसंच ३२ महिला अशा एकूण ५६ ग्रामस्थांना त्यांच्या गाईगुरांसह आज सुरक्षित स्थळी आणलं आहे.

चिपळूणमध्ये काही ठिकाणी १२ फुटांहून अधिक पाणी साचलं आहे. या ठिकाणी लोक घराच्या छपरांवर जाऊन बसले आहेत. अशा लोकांपर्य़ंत पोहोचण्याचा एनडीआरएफचे जवान प्रयत्न करत आहेत

सकाळी पावसाचा जोर कमी होऊन पाणी देखील ओसरण्यास सुरुवात झाल्यानं एनडीआरएफच्या बचाव कार्याला देखील वेग आला आहे.

एनडीआरएफच्या जवनांकडून अनेक बोटींच्या माध्यमातून पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आणलं जात आहे.

अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे रस्तेमार्गे कोकणात पोहोचणं शक्य नसल्यामुळे हवाई मार्गे देखील जवान बचाव कार्यसाठी दाखल झाले आहेत.

Read in English