आठवड्याचे राशीभविष्य : 21 ते 27 मार्च 2021, 'या' राशीच्या लोकांना आर्थिक लाभ अन् भाग्योदयाचा योग तर काहींना जपून राहण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 12:43 PM2021-03-22T12:43:20+5:302021-03-22T13:06:21+5:30

Weekly Horoscope 21 March to 27 March 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपली आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून आपणास आपल्या बँकेतील गंगाजळीवर लक्ष ठेवावे लागेल. खर्चांवर नियंत्रण ठेवावे. विनाकारण खर्च होण्यावर प्रतिबंध ठेवावा. ह्या आठवड्यात प्रवास करून आपणास तजेला व आनंद प्राप्त होईल. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या प्रियव्यक्तीस मोकळेपणाने भावना व्यक्त करून दाखवू शकाल. त्यामुळे ती आपणास समजून घेऊ शकेल. कौटुंबिक जीवनात आनंद पसरेल. नोकरीत वरिष्ठांकडून काही सुविधा मिळण्याची शक्यता आहे. व्यापारासाठी परदेशास जाण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात चांगली प्रगती होईल. हा आठवडा आरोग्याच्या बाबतीत काहीसा प्रतिकूल आहे. आपणास पायाचे किंवा डोळ्यांचे विकार होण्याची शक्यता आहे.

आठवड्यात आपणास कुटुंबाचा विचार करण्याची संधी मिळेल. आपण आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या व कुटुंबाच्या गरजा समजावून घ्याल. ह्या जवाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आपण पुढाकार घ्याल. त्यामुळे कुटुंबात आपले वजन वाढेल. समाजात आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाढेल. आपणास आपल्या कार्यालयात सुद्धा चांगले परिणाम मिळतील. आपल्यातील हजार जबाबीपणा व आपले कौशल्य, आपल्या कामात लोकांच्या पुढे जाण्यास मदतरूप ठरेल. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. व्यापारी वर्गास मात्र थोडी काळजी घ्यावी लागेल. त्यांचा एखादा चुकीचा निर्णय त्यांच्यासाठी त्रासदायी ठरू शकतो. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा चांगला असून थोडे अडथळे पार केल्यास प्रेमालाप करण्याची चांगली संधी मिळेल. आपण आपल्या प्रियव्यक्तीस एखाद्या चांगल्या हॉटेलात जेवण करण्यास घेऊन जाऊ शकाल. आठवड्यात आपल्या जोडीदारास आपण महागडी भेटवस्तू देऊ शकाल. नशिबाची साथ मिळाल्याने कार्यात यश प्राप्त होईल. आठवड्याच्या मध्यास प्रवासाची संधी मिळेल.

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण पूर्ण शक्तीने आपल्या सर्व कामात मार्गक्रमण कराल. आपले आत्मबल सुद्धा चांगले असेल. आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावयास हवे ह्याची आपणास जाणीव होईल. व्यापाऱ्यांनी नवीन शैली अंमलात आणल्यास त्यांना चांगला लाभ होईल. आपली आर्थिक गुंतवणूक आपल्या उपयोगी येईल. नोकरी करणाऱ्या जातकांनी कामावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसे करण्यात आपण जर यशस्वी होऊ शकलात तर पदोन्नती संभवते. आपणास वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकेल. आपणास थोडे जास्त कष्ट करावे लागतील. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. प्रणयी जीवनात आनंद पसरेल. हा आठवडा वैवाहिक जीवनात सुद्धा आनंद निर्माण करणारा आहे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

आठवड्याच्या सुरुवातीपासून आपल्या मार्गात अडथळे निर्माण करू शकतील अशा गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न आपणास करावा लागेल. ह्या दरम्यान आपण स्वतंत्र होण्याचा प्रयत्न कराल. आपले निर्धारित लक्ष्य आपणास जवाबदाऱ्या पूर्ण करण्यास प्रवृत्त करेल. आपले वैवाहिक किंवा प्रणयी जीवन सुखद होण्यासाठी आपणास जोडीदारा समक्ष आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त कराव्या लागतील. ह्या आठवड्यात आर्थिक आघाडीवर आपली सक्रियता वाढेल. ह्या दरम्यान प्राप्तीचे नवीन स्रोत तयार करण्याचा प्रयत्न आपण कराल. व्यापारी वर्ग आपले नवीन उत्पादन बाजारात आणू शकतील. आपण आपल्या संवाद कौशल्याच्या जोरावर व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनात समतोल राखू शकाल. आठवड्याच्या अखेरीस प्रवासाची संधी मिळेल. आठवड्यात आपले आरोग्य उत्तम राहील.

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होत असल्याचे दिसून येईल. आपण केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीच्या ठिकाणी सावध राहावे लागेल. परिस्थिती हळूहळू आपल्या नियंत्रणात येत असल्याचे दिसले तरी सावध राहावे. व्यापाऱ्यांनी निव्वळ व्यापाराचा विचार न करता मार्केटिंगचा सुद्धा थोडा विचार करावा. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापारात कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. आठवड्यात आपली प्रकृती थोडी नाजूक होण्याची शक्यता आहे. नेत्र विकार किंवा इतर विकार संभवतात. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. विवाहितांना आठवड्यात एखादी चांगली बातमी मिळेल.

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपणास अपेक्षेनुसार परिणाम मिळतील. कामाच्या बाबतीत आपण केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामगिरीचे कौतुक होईल. पूर्वी पासून चालत आलेल्या वाईट काळाची आता सांगता होईल. व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा आठवडा काही आश्चर्यकारक परिणाम देणारा ठरेल. रत्नांचा व्यापार करणाऱ्यांना विशेष लाभ होईल. वैवाहिक जीवनात जिव्हाळा निर्माण होईल. एखाद दुसरा वाद झाला तरी त्याचा विशेष परिणाम वैवाहिक जीवनावर होणार नाही. प्रेमीजनांना ह्या आठवड्यात खुशखबर मिळेल. आपल्या प्रियव्यक्तीस आपल्या मनातील गोष्ट आपण मोकळेपणाने सांगण्यात यशस्वी व्हाल. आपल्या प्रकृतीत सुधारणा झाली तरी काळजी घ्यावी लागेल. आठवड्यात आपणास काही त्रास होऊ नये म्हणून शक्यतो प्रवास टाळावा.

हा आठवडा आपल्यासाठी लाभदायी असला तरी आठवड्याच्या सुरुवातीपासून आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावीच लागेल. आपल्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा सहवास लाभल्याने आपण आनंदित व्हाल. पूर्वजांच्या घरी जाण्याची संधी मिळेल. जुनी जमीन जायदाद बघून त्यावर काही बांधकाम सुद्धा करवून घेऊ शकाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल व काहीतरी नवीन शिकण्याची आवड निर्माण होईल. आपली बुद्धी तीव्र होऊन त्याचा आपणास चांगला फायदा होईल. व्यापाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील व आपल्या क्षेत्रात प्रतिष्ठा प्राप्त होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी बोलताना संयमित राहावे. आपल्याकडून त्यांचा अपमान होत आहे असे त्यांना वाटता कामा नये. वैवाहिक जीवन सामान्यच राहील. हळू हळू आपल्या वैवाहिक जीवनात स्थैर्य निर्माण होईल. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपला वैवाहिक जोडीदार मानसिक दृष्ट्या त्रासलेला असेल किंवा त्याची प्रकृती खालावली असल्याने त्रासलेला असेल, तेव्हा आपणास त्याची काळजी घ्यावी लागेल. आपणास जोडीदाराच्या पाठीशी उभे राहावे लागेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्य आहे. आपण आपल्या प्रेमाचा आनंद घेऊ शकाल. मात्र, अधून मधून आपल्या दोघातील अहंकार आडवा येण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी लागेल. प्राप्तीत वाढ होईल. एखादा मोठा लाभ संभवतो. व्यापारात सावध राहावे लागेल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा सामान्य आहे. त्यांना एखाद्या नवीन नोकरीची संधी सुद्धा मिळू शकते. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. आपल्या प्रकृतीत चढ - उतार येत राहतील.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपली प्रकृती खालवण्याच्या शक्यतेमुळे आपणास त्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या खर्चात वाढ होईल. शत्रूंच्या कारवाया वाढतील. आपण शत्रूंवर जरी मात करू शकलात तरी मानसिक तणाव मात्र आपणास नक्कीच जाणवेल. तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्या कामासाठी इतरांवर अवलंवून राहू नये, तसेच आपले कच्चे दुवे कोणास सांगू नयेत. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामावर लक्ष ठेवावे लागेल. कामचुकारपणा टाळावा लागेल. व्यापारीवर्गास आपल्या कष्टांवर भरंवसा ठेवणे हितावह होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. प्रेमीजनांना आठवड्याच्या सुरवातीस काही चांगले परिणाम मिळून जेथे एकमेकांच्या सहवासात सुखद क्षण घालवता येतील अशा एखाद्या दूरवरच्या ठिकाणी फिरावयास जाण्याची संधी मिळेल. आवश्यकता नसल्यास ह्या आठवड्यात प्रवास टाळावेत.

आठवड्यात आपणास बरेच काही करण्याची मोकळीक मिळेल, मात्र आपण सावध राहावे. अति आत्मविश्वास आपले नुकसान करू शकेल. प्राप्तीत वाढ होईल. त्यामुळे आपण यशाच्या शिखरावर पोचू शकाल. व्यापार वृद्धी होईल. नोकरी करणाऱ्या जातकांचा सुद्धा ह्या आठवड्यात मोठा फायदा होऊ शकतो. आपले सहकारी आपल्या खांद्यास खांदा देऊन आपणास सहकार्य करतील. आपले आरोग्य उत्तम राहिल्याने आपण प्रत्येक कार्यात यशस्वी होऊ शकाल. आपले व्यवहार कौशल्य आपल्या कामी येईल. आपण खूपच सर्जनशील व्हाल. आपल्या सभोवतालच्या व्यक्ती आपल्याकडे आकर्षित होतील. प्राप्तीत वाढ होईल. बँकेतील गंगाजळी वाढेल. वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. प्रेमीजनांची स्थिती हळू हळू सुधरू लागेल व पूर्वी असलेले तणाव आता निवळू लागतील. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी होण्याची शक्यता असल्याने त्यांनी आपल्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस कुटुंबात वाद - विवाद होण्याची शक्यता असून त्यांचे निराकरण करण्यात आपला बहुमोल वेळ खर्च होईल. आपणास खूपच लक्ष द्यावे लागेल. कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीच्या प्रकृतीकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल. ह्या सर्वां व्यतिरिक्त आपणास आपल्या कामावर सुद्धा लक्ष द्यावे लागेल. नोकरी करणाऱ्या जातकांच्या कामात काही अडथळे येऊ शकतात. हे अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला स्वतःला प्रयत्न करावे लागतील. आपल्या विरोधकांवर नजर ठेवावी लागेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. आपल्या व्यापाराचा विस्तार व उन्नती होईल. पैश्यांची आवक मात्र कमी होईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

आठवड्याच्या सुरुवातीस मानसिक तणावातून बाहेर पडण्याचा जर आपण प्रयत्न केलात तर हा आठवडा आपल्यासाठी चांगला ठरू शकेल. आपल्या खर्चात जशी वाढ होईल, तशीच प्राप्तीत सुद्धा हळू हळू वाढ होईल. आठवड्याच्या मध्यास खर्चात कपात होईल. आठवड्याच्या अखेर पर्यंत आपण आनंदित व्हाल. आपली आर्थिक स्थिती प्रबळ होईल. कुटुंबात एखादा चांगला कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. रुचकर भोजनाचा आस्वाद घेता येईल. लोकांच्या भेटीगाठी होतील. वैवाहिक जीवन सामान्यच राहील. स्वतःला महत्वाची व्यक्ती समजू नये. आपण जर सामान्य माणसा सारखे वागलात तर आपल्या लोकांचे अधिक प्रेम मिळवू शकाल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्य आहे. आपल्या नात्यात आपलेपणा वाढेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. ह्या आठवड्यात आपली प्रकृती उत्तम राहील. आठवड्यात घाईघाईने केलेल्या कामामुळे नुकसान सोसावे लागू शकते.