आठवड्याचे राशीभविष्य : 18 जुलै ते 24 जुलै 2021, 'या' राशीच्या व्यक्तींना प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळणार, प्रतिष्ठा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 10:17 AM2021-07-20T10:17:00+5:302021-07-20T10:20:01+5:30

Weekly Horoscope 18 July to 24 July 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

हा आठवडा आपणास चांगली फले देणारा आहे. असे असले तरी एखाद्या बाबतीत आपणास अपमान सहन करावा लागणार असल्याने आपला स्वाभिमान दुखावणार नाही ह्याची काळजी घ्यावी. आपल्या वडिलांशी आपले मतभेद होण्याची शक्यता असल्याने त्यांची व त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक तणावाचा प्रभाव आपल्या कामावर होताना सुद्धा दिसून येईल. नोकरीत आपले मन रमणार नाही व त्यामुळे आपली कामगिरी चांगली होऊ शकणार नाही. आपल्या हातून कामात काही चूका होतील. व्यापाऱ्यांना आयात - निर्यातीतून चांगला फायदा होईल. परदेशाशी केलेले व्यवहार लाभदायी ठरतील. प्रणयी जीवनात रोमांस वाढेल. आपल्या प्रियव्यक्तीसह बाहेर फिरावयास जाण्याची संधी मिळेल. विवाहितांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. जोडीदारासह नवीन काही करण्याची संधी मिळेल. आपली प्रकृती उत्तम राहील.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपण काहीसे चिंतातूर असाल. चिंतेमुळे आपणास मानसिक थकवा जाणवेल, तेव्हा चिंतामुक्त होण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक वातावरण सुखद असेल. कुटुंबासाठी आपण नवीन टी. व्ही., फ्रिज किंवा ओव्हन खरेदी करू शकाल. कुटुंबात एखाद्या व्यक्तीच्या विवाहाची तयारी सुद्धा जोरात चालू राहील. वैवाहिक जीवनात प्रेम वृद्धिंगत होईल. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. नोकरीच्या निमित्ताने आपणास काही नवीन लोकां बरोबर काम करण्याची संधी मिळेल. त्यांच्या कामामुळे आपण प्रभावित व्हाल. ह्या दरम्यान आपण आपली ओळख निर्माण करू शकाल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपले काम कमीत कमी वेळात पूर्ण होईल अशा पद्धतीने आपल्या कामाचे वेळापत्रक बनवाल. ह्या आठवड्यात आपले आरोग्य उत्तम राहिल्याने आपणास प्रत्येक कामात यश प्राप्त होईल.

हा आठवडा आपणास मध्यम फलदायी आहे. आठवड्याची सुरुवात काहीशी नाजूकच असेल. आपणास चिंतामुक्त होण्याचा मार्ग शोधावा लागेल. मानसिक ताणाचा प्रभाव आपल्या प्रत्येक कामावर होताना दिसून येईल. नोकरी करणाऱ्या जातकांची कामगिरी मात्र चांगली होईल. आपण सनदशीर मार्गाने कामे करण्यास प्राधान्य द्याल व त्यामुळे आपणास विरोधाचा सामना सुद्धा करावा लागू शकतो. कुटुंबातील लहान व्यक्तींचे प्रेम व स्नेह प्राप्त होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी उत्तम आहे. विवाहितांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. ह्या आठवड्यात आपल्या प्राप्तीत वाढ व खर्चात कपात झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपले आरोग्य उत्तम राहिले तरी आपल्या खाण्या - पिण्यावर आपण लक्ष न दिल्याने काही त्रास होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. आपले जुने मित्र, नातेवाईक व शेजाऱ्यांच्या सहवासात आपण आनंदित व्हाल. त्यांच्यामुळे आपल्या चेहेऱ्यावर हास्य उमटेल.

आठवड्याच्या सुरुवातीस आपणास कौटुंबिक गोष्टींसाठी अधिक ऊर्जा खर्च करावी लागू शकते. आपण व्यावसायिक गोष्टींवर अधिक लक्ष द्याल. नोकरी करणाऱ्या जातकांना उपलब्ध परिस्थितीत काम करणे लाभदायी ठरेल. प्रणयी जीवनात आपण अधिक संवेदनशील व्हाल. आठवड्याच्या अखेरीस आपल्या प्रिय व्यक्तीच्या किंवा वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात वेळ चांगला जाईल. आठवड्याच्या मध्यास कामाच्या व्यस्ततेमुळे विश्रांतीसाठी वेळ मिळणे दुर्लभ होऊ शकते. असे असले तरी ह्या दरम्यान आपला उत्साह व ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आपणास आहार व विश्रांती ह्यासाठी अधिक जागरूक राहावे लागेल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपले व्यावसायिक संपर्क वाढतील. आठवड्याच्या सुरवातीस विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रित झाले तरी अखेरच्या दिवसात निराशा पदरी पडण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आठवड्यात रक्तदाबाशी संबंधित समस्या संभवते.

हा आठवडा आपल्या मनात नवीन उत्साह निर्माण करणारा आहे. आपण आपल्या प्रणयी जीवनात उत्साहपूर्वक वाटचाल कराल. आपल्या मनातील प्रेम व स्नेह भावना उफाळून येईल. वैवाहिक जीवनात रोमांस वाढेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सुद्धा चांगला आहे. आपण बराच वेळ आपल्या प्रिय व्यक्तीशी फोनवर संवाद साधू शकाल. आपल्या प्रिय व्यक्तीस आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी खूप वेळ घ्याल. आपल्या खर्चात वाढ होईल. आपण ह्या अगोदर जर सरकार विरुद्ध काही कार्य केले असेल तर ह्या आठवड्यात त्याची शिक्षा भोगावी लागू शकते. नोकरीत आपली कामगिरी चांगली होईल. आपल्या कष्टांचे चीज होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. आपल्या व्यवसायात कोणीही आपल्याशी स्पर्धा करू शकणार नसल्याने आपण प्रगती साधू शकाल. आठवड्यात आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांच्या अध्ययनात एखादी चिंता निर्माण होईल व त्यामुळे त्यांना अधिक एकाग्रतेने अध्ययन करावे लागेल. प्रेमीजनांना काही समस्यांचा सामना करावा लागेल. अशा परिस्थितीत शांत राहिल्यास समस्यांचे निराकरण होऊ शकेल. विवाहितांच्या जीवनात रोमांस वाढला तरी काही जातक विवाहबाह्य संबंधांकडे आकर्षित होतील. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होण्याची संभावना आहे. आपले आरोग्य उत्तम राहिल्याने आपण जीवनाचा खरा आनंद उपभोगू शकाल. नोकरी करणाऱ्या जातकांची कामगिरी उत्तम होईल. व्यापाऱ्यांना नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. व्यापाराच्या बाबतीत आपण आपल्या योजनां बद्धल नवीन लोकांशी चर्चा कराल. मात्र, प्रत्येक व्यक्तीवर विश्वास न ठेवण्याची खबरदारी घ्यावी. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी उत्तम फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपणास मिळालेल्या संधीचा योग्य तो उपयोग करून घ्यावा. अशी संधी पुन्हा येणार नसल्याने ती हातची जाऊन देऊ नका. आपल्या प्राप्तीत मोठी वाढ होईल. व्यापाऱ्यांना नवीन निविदा मिळण्याची शक्यता असून त्यात त्यांचा मोठा फायदा होईल. कामे चांगली केल्यास आपले भविष्य उज्ज्वल होईल. नोकरीत आपणास मोठा फायदा होईल. आपला पदभार व कार्यभार ह्यात वाढ होईल. पगारवाढ सुद्धा संभवते. कौटुंबिक वातावरण चांगले राहिले तरी एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. आपली प्रकृती चांगली राहील. आपणास मित्रांसह किंवा प्रियव्यक्तीसह एखाद्या विवाह समारंभास जाण्याची संधी मिळेल. हौसमौज करू शकाल. विवाहित व्यक्ती आपल्या कामाचा भार वैवाहिक जोडीदारास बोलून दाखवतील व त्यामुळे काही दुरावा निर्माण होऊ शकतो. कार्यालयीन कामे कार्यालयातच सोडून आपल्या वैवाहिक जोडीदारासह वेळ घालविण्याचा प्रयत्न करावा.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपणास चिंतामुक्त व्हावे लागेल. स्वतःला एकटे समजू नये. ह्या उलट सर्व जग आपल्या पाठीशी आहे असे समजावे. अशा उत्साहात कामे केल्यास आपण यशस्वी व्हाल. ह्या आठवड्याच्या सुरवातीस खर्चात वाढ झाली तरी नंतर त्यात कपात होणार असल्याने काळजी करू नये. कुटुंबियांचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल. कुटुंबात एकमेकां प्रती प्रेम व स्नेह भावना राहील. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामाचे मोठे फल मिळेल. आपली बदली सुद्धा संभवते. व्यापाऱ्यांना दूरवरच्या क्षेत्रात कामे केल्याचा फायदा होईल. आपले नवीन संपर्क होऊन व्यापारात त्याचा फायदा होईल. हा आठवडा विवाहितांसाठी चांगला आहे. वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजनांना लहान - सहान समस्या येऊन सुद्धा आपल्या प्रेमावर विश्वास बसून नाते अधिक दृढ करता येईल.

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच प्राप्ती होऊ लागेल. आपण खूप आनंदात राहाल. विवाहितांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. आपण जोडीदाराशी प्रेमळ वार्तालाप करून जोडीदाराच्या हृदयात शिरून नाते अधिक दृढ करू शकाल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा काहीसा नाजूक असल्याने त्यांना थोडी काळजी घ्यावी लागेल. नोकरी करणाऱ्या जातकांची पदोन्नती होण्याची दाट शक्यता असल्याने आपल्या कामात कोणतीच कुचराई करू नये. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा मदतरूप ठरणारा आहे. आपला व्यापार वृद्धिंगत करण्यात यश प्राप्त होईल. आपली प्रखर बुद्धिमत्ता बाजार काबीज करण्यास उपयुक्त ठरेल. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण आपल्या कामात लक्ष देऊन नोकरीत पूर्णपणे समर्पीत व्हाल. असे समर्पण केल्याने आपली कामगिरी चांगली होऊन आपणास प्रशंसित केले जाईल. व्यापाऱ्यांना शासना कडून मोठा फायदा संभवतो. आपण सरकारी योजनांचा फायदा घेऊन व्यापारात मोठी प्रगती साधू शकाल. वैवाहिक जीवन सामान्यच राहील. त्यात थोडा ताण वाढण्याची शक्यता आहे. आपल्यावर एखादा खोटा आळ येण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. त्यांना ह्या आठवड्यात एकांतात वेळ घालविण्याची संधी मिळाल्याने ते आनंदित होतील. परिस्थितीमुळे आपण आपल्या सर्जनशीलतेचे दर्शन घडवून काही चांगले करून दाखवू शकाल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. असे असले तरी आपल्या काही योजना आपणास खूप आर्थिक प्राप्ती करून देऊ शकतील. प्राप्तीत वाढ होईल. खर्चात कपात होईल. ह्या सर्वांमुळे आपणास आनंद होईल व आपल्या चिंता कमी होतील. असे असले तरी अधून मधून खर्चात वाढ होण्याच्या शक्यतेमुळे आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवावे. आपले आरोग्य चांगले राहील. वैवाहिक जीवन प्रेम व रोमांसने परिपूर्ण असेल. नात्यातील गोडवा वाढेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा आपल्या प्रिय व्यक्तीस विवाहाची मागणी घालण्यासाठी अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना अध्ययनात चांगले परिणाम मिळतील. अध्ययनात लक्ष लागून परीक्षेचा निकाल सुद्धा चांगला लागेल. कौटुंबिक जीवन समाधानी राहील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपणास आपले खर्च नियंत्रित ठेवावे लागतील. विनाकारण केलेले प्रवास व काळजी आपणास त्रासदायी ठरू शकेल. त्या पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. कोणाशी विनाकारण वाद होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. सासुरवाडी कडील लोकांशी संबंधात सौहार्दता निर्माण होईल. वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. प्रेमीजनांना आपल्या प्रिय व्यक्तीचा रुक्षपणा दिसण्याची शक्यता आहे. त्याचा आपल्या नात्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने थोडे शांत राहून व धीर धरून राहावे. नोकरी करणाऱ्या जातकांना कष्ट केल्यासच फायदा होऊ शकेल. व्यापाऱ्यांना यशस्वी होण्याची मोठी संधी मिळेल. विरोधकां पासून सावध राहावे. स्वतःवर विश्वास ठेवून कामे करावीत. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना तांत्रिक विषयात यश प्राप्त होईल.