आठवड्याचे राशीभविष्य : 12 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर 2021, प्रिय व्यक्तीची भेट होणार; 'या' राशीच्या मंडळींना सुखद धक्का मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 10:17 AM2021-09-13T10:17:00+5:302021-09-13T10:20:02+5:30

Weekly Horoscope 12 September to 18 September 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपल्या अपेक्षा वाढतील. त्या फलद्रुप होण्यासाठी आपण खूप प्रयत्न कराल. हे प्रयत्न चांगले असले तरी आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करून मेहनत केल्याने अखेर आपणास थकवा जाणवेल. आठवड्याच्या मध्यास थोडी अस्वस्थता जाणवेल. अतिरिक्त खर्च व मानसिक ताण ह्यांचा त्रास होऊ नये म्हणून कोणाशी विनाकारण वाद - विवाद वाढवू नका. आपली प्राप्ती सामान्य राहिली तरी आपण मानसिक तणावा खाली वावराल. विद्यार्थ्यांना चांगले अनुभव येतील. अभ्यासात आपले लक्ष लागेल. वैवाहिक जीवन प्रेमाने परिपूर्ण असेल. प्रेमीजन आपल्या प्रिय व्यक्तीस विवाहाची मागणी घालू शकतील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपणास काही शारीरिक आव्हानांचा सामना करावा लागणार असल्याने आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत आपण निश्चिन्त राहू शकाल. शासना कडून लाभ मिळण्याचा आपला मार्ग मोकळा होईल. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी काहीसा त्रासदायी असू शकतो. ह्या दरम्यान आपसातील समन्वयाचा अभाव असल्याने निष्कारण वाद - विवाद वाढतील, तेव्हा धीर धरावा. विवाहितांसाठी हा आठवडा उत्तम आहे. आठवड्याच्या मध्यास आपणास काही चिंता सतावतील. आपल्या खर्चात वाढ होईल. मात्र, प्राप्ती चांगली झाल्याने विशेष त्रास जाणवणार नाही. नोकरी करणाऱ्या जातकांना चांगले परिणाम मिळतील. ह्या आठवड्यात व्यापारी आपला व्यापार विस्तार करण्यात यशस्वी होतील.

हा आठवडा आपल्यासाठी अंशतः फलदायी आहे. आठवड्याची सुरवात संथ गतीने होईल. ह्या आठवड्यात आपले आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने शक्यतो प्रवास टाळावेत. आपले आरोग्य बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे. आपल्या कामात विलंब होत असल्याचे आपणास जाणवेल व त्यामुळे आपण चिंतीत व्हाल. परंतु, आठवड्याच्या मध्यास परिस्थितीत सुधारणा होऊन आपणास आपल्या निर्णयशक्तीचा लाभ होईल. आठवड्याच्या अखेरीस आपण कौटुंबिक कामांचा आनंद घेऊ शकाल. ह्या दरम्यान कुटुंबातील वडीलधाऱ्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता असल्याने आपणास त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबात एखादा संपत्ती विषयक वाद उफाळून येण्याची शक्यता असून त्यामुळे घरातील वातावरण गढूळ होईल. असे असले तरी कायदेशीर बाबीत आपणास लाभ होईल असे दिसत आहे. हा आठवडा प्रेमीजनांसाठी खूपच चांगला आहे. सामाजिक माध्यमांवर आपण आपले फोटो व विडिओ लावून एकमेकांच्या प्रतिक्रियेने खुश व्हाल. आपली बांधिलकी वाढेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील तणाव निवळू लागतील. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा चांगला आहे. त्यांना सरकारी क्षेत्रा कडून लाभ होण्याची शक्यता सुद्धा आहे. व्यापाऱ्यांसाठी मात्र हा आठवडा काहीसा नाजूक असू शकतो.

आठवड्याच्या सुरवातीस कुटुंबीय व प्रियव्यक्ती ह्यांच्यात आपल्या विषयी असंतोष निर्माण झाल्याचे आपणास जाणवेल. आपल्या कारकीर्दीस आपण अधिक प्राधान्य दिल्याने त्यांच्यासाठी आवश्यक तितका वेळ देऊ शकणार नाही, व हेच त्यांच्या असंतोषाचे प्रमुख कारण असेल. आठवड्याच्या पूर्वार्धात नात्यात दुरावा वाढत असल्याचे आपणास जाणवेल. परंतु, आठवड्याच्या मध्यास आपला कल पुन्हा आपल्या जोडीदारा प्रति झाल्याचे आपणास जाणवू लागेल. आपणास मदत करण्यास जे सदैव तत्पर असतात व जे आपल्या गोष्टीत स्वारस्य दाखवतात अशा व्यक्तींना मदत करण्यासाठी आपण तयार व्हाल. आठवड्याच्या मध्यास आपल्या प्रकृतीत चढ - उतार होण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान आपणास शारीरिक व मानसिक तणावास सामोरे जावे लागण्याच्या शक्यतेमुळे आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. आठवड्याच्या अखेरीस आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. थोडक्यात योग्य जोडीदार मिळाल्याने आपणास सुरक्षितता व आनंद जाणवेल. ह्या आठवड्यात आपली आर्थिक स्थिती मजबूत राहणार असली तरी कोणालाही उसने पैसे देण्या पासून दूर राहावे.

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण कुटुंबाकडे लक्ष देऊन कुटुंबाप्रती आपल्या जवाबदाऱ्या समजून घ्याल. एखाद्या गोष्टीमुळे थोडा विरोध झाला तरी त्याचा विशेष त्रास होणार नाही. आपण आपल्या कामावर सुद्धा लक्ष केंद्रित कराल. हा आठवडा नोकरी करणाऱ्या जातकांसाठी चांगला असून त्यांची नोकरीतील कामगिरी उत्तम होईल. व्यापारास गती येईल. आठवड्याच्या मध्यास आपण प्रणयी जीवनासाठी वेळ काढू शकाल. आपल्यातील सर्जनात्मकता आपल्या प्रिय व्यक्तीस खुश करण्यास कारणीभूत होईल. वैवाहिक जीवनात प्रेम व स्नेह वृद्धिंगत होईल. आठवड्याच्या अखेरीस विनाकारण प्रवास कराल, ज्यात आपणास अतिरिक्त खर्च व शारीरिक त्रास संभवतो. तेव्हा शक्यतो असा प्रवास करणे टाळा.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. जे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना खूपच चांगले परिणाम मिळतील. आपणास पदोन्नतीसह एखादे मोठे बक्षीस मिळण्याची शक्यता सुद्धा आहे. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा अत्यंत चांगला असला तरी आपल्या वागणुकीने कोणालाही त्रास होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात चढ - उतार येतील. आपणास आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी उत्तम आहे. त्यांना आपल्या नात्यात काही जुन्या पद्धतींचा प्रयोग करावा लागेल. असे केल्याने आपली प्रिय व्यक्ती आपल्यावर खुश होईल. एखाद्या धर्मादाय प्रवृत्तीत सहभागी होऊन आपण आपल्या प्रियव्यक्तीस प्रभावित करू शकाल. आपली प्रकृती उत्तम राहील. मानसिक तणाव कमी होतील. व्यापाऱ्यांना कष्टांचे यथोचित फल मिळेल.

सप्टेंबर महिन्यातील हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपली आर्थिक स्थिती मजबूत बनविण्याकडे अधिक लक्ष देऊन एखाद्या योजनेत गुंतवणूक कराल व त्यामुळे आपला पैसा व बँकेतील शिल्लक वाढेल. खर्चात वाढ होईल व त्यामानाने प्राप्ती सामान्यच राहील. ह्या दरम्यान करचोरी किंवा अवैध काम करणे आपणास महागात पडण्याच्या शक्यतेमुळे अशा कामां पासून दूर राहावे. आपल्या ऊर्जेत वाढ झाल्याचे आपणास जाणवेल. आपल्या व्यक्तिमत्वातील आकर्षण वाढेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपल्या नात्यातील प्रेम वाढेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन रोमांसाने भरलेले राहून आपण वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. अधून - मधून आपला वैवाहिक जोडीदार राग व्यक्त करण्याची शक्यता असल्याने सावध राहावे.

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण स्वतःवर लक्ष केंद्रित कराल. स्वतःच्या चुका समजून घेण्यासाठी आत्ममंथन कराल. त्यामुळे आपण अधिक चांगले काय करू शकतो हे आपणास समजेल. आपल्यात असलेले कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करावा. वैवाहिक जीवनात सुखद क्षणांची वाढ झाल्याचे जाणवेल व त्यामुळे आपले नाते दृढ होईल. आपणास आपल्या वैवाहिक जोडीदाराचे सौख्य लाभेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी कसोटीचा असू शकतो. आपणास आपल्या प्रिय व्यक्तीचे कटू बोल टाळावे लागतील. तसेच त्यांना उलट उत्तर न देता शांतिपूर्वक संवाद साधावा लागेल. आपले आरोग्य उत्तम राहील. आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल. कुटुंबात एखाद्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकेल. आपणास शासनाकडू एखादा मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपणास काही चिंता सतावतील, ज्यातून बाहेर येण्यास आपल्याला खूप वेळ लागेल. मात्र त्या दूर करणेच हितावह राहील. खर्च नियंत्रित करण्याचा प्रयत्न करावा. प्राप्तीत वाढ झाल्याने आपले समाधान होईल. कामा निमित्त केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत आपली कामगिरी चांगली होईल. परंतु विनाकारण कोणाशी वाद होऊन परिस्थिती आपल्या विरुद्ध जाऊ शकते, तेव्हा काळजी घ्यावी. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी उत्तम आहे. आपणास आपल्या कामाचे यथोचित चांगले फल मिळेल. आपल्या मान - सन्मानात वाढ होईल. शासनाकडून लाभ संभवतो. वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला असला तरी आपण कामात व्यस्त राहिल्यामुळे आपल्या दोघात दुरावा निर्माण होऊ शकतो. आपले आरोग्य उत्तम राहील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस वगळून इतर सर्व दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल व त्यामुळे आपण यशाच्या मार्गावर वाटचाल करू शकाल. खर्चात कपात झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणारे जातक सर्जनात्मक पद्धतीने कामे करून आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्यच आहे. आपण आपला नफा अनेक पटीने वाढविण्याचा प्रयत्न करून कशा प्रकारे आपण कामे करावीत ह्याचा विचार कराल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुरळीत चालेल. आपण आपल्या वैवाहिक जोडीदाराशी एकनिष्ठ राहाल व त्यांच्या प्रत्येक गरजांकडे लक्ष द्याल. आपली प्रियव्यक्ती आपल्या कामात व्यस्त राहिल्यामुळे आपणास वेळ देऊ शकणार नाही व त्यामुळे आपल्यात भांडण होण्याच्या शक्यतेमुळे प्रेमीजनांना आपल्या प्रिय व्यक्तीच्या नाराजीस सामोरे जावे लागेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. आपण कष्ट करण्याचा आनंद घ्याल व त्यामुळे आपली प्रतिमा उंचावेल. आपली काम करण्याची पद्धत लोकांना आवडेल. आपण ज्यांच्या कडून कधी अपेक्षाही केली नसेल असे आपले विरोधक सुद्धा आपली प्रशंसा करतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी उत्तम आहे. आपणास शासनाशी संबंधित क्षेत्रात काम करण्याने जास्त फायदा होईल. फायद्यात वाढ झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपले आरोग्य ह्या आठवड्यात उत्तम राहिल्याने कोणतीही मोठी समस्या संभवत नाही. प्रणयी जीवनात हा आठवडा भावनात्मकतेचा राहील. आपणास एकमेकां प्रति भावनेने जोडले गेल्याची जाणीव झाल्याने आपले नाते अधिक दृढ होईल. विवाहितांना आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या वागणुकीचा त्रास होऊ शकतो, परंतु तरी सुद्धा आपण प्रयत्न केल्यास नात्यात गोडवा निर्माण होईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपणास नशिबाची साथ मिळाल्याने आपली बरीचशी कामे होऊ शकतील. व्यापारात प्रगती होईल. आपली प्रगती झाल्याने लोक आपली ईर्ष्या करू लागतील, ह्याचा अर्थ असा कि आपण योग्य मार्गाने प्रगती केली आहे. आपली कामे चालूच ठेवा. ह्या आठवड्यात नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामात यश प्राप्त होईल. नोकरीत आपली पदोन्नती संभवते. प्राप्तीत वाढ झाली तरी खर्च होतीलच. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. कौटुंबिक जीवनात आनंद पसरेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा उन्नतीदायक आहे. आपण आपल्या प्रिय व्यक्तीस विवाहाची मागणी घालू शकाल. विवाहितांना त्यांचा वैवाहिक जोडीदार काही उलट सुलट बोलल्याने वाईट वाटण्याची शक्यता आहे. तेव्हा काळजीपूर्वक एकमेकांशी संवाद साधून समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. आठवड्याचे सुरवातीचे व अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.