२१ जूनचे सूर्यग्रहण या सहा राशींसाठी ठरणार अशुभ, या उपायांनी मिळेल लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 10:02 PM2020-06-16T22:02:01+5:302020-06-16T22:34:54+5:30

२१ जून रोजी होणारे सूर्यग्रहण जगातील अनेक घटनांचे साक्षीदार बनू शकते. या ग्रहणाच्या प्रभावाने काही राशींना लाभ तर होऊ शकतो तर काही राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

२१ जून रोजी होणारे सूर्यग्रहण जगातील अनेक घटनांचे साक्षीदार बनू शकते. या ग्रहणाच्या प्रभावाने काही राशींना लाभ तर होऊ शकतो तर काही राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हे सूर्यग्रहण सहा राशींच्या लोकांसाठी अशुभ ठरू शकते. जाणून घेऊयात कुठल्या आहेत त्या राशी.

वृषभ - Marathi News | वृषभ | Latest rashi-bhavishya Photos at Lokmat.com

वृषभ राशीच्या लोकांना हे सूर्यग्रहण आर्थिक आर्थिक दृष्टीने आणि नोकरीच्या बाबतीत त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे थोडी खबरदारी घेण्याची गरज आहे. हे ग्रहण राशीच्या द्वितीय भावामध्ये होत आहे. हा भाव पैसे आणि कुटुंबाचा भाव मानला जातो. त्यामुळे तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. तसेच तुम्हाला अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.

मिथुन - Marathi News | मिथुन | Latest rashi-bhavishya Photos at Lokmat.com

मिथुन राशीच्या लोकांसाठीही हे ग्रहण प्रतिकूल ठरणारे आहे. हे ग्रहण मिथुन राशीमध्ये सुरू होत आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव या राशीसाठी शुभदायी नाही आहे. त्यामुळे तुम्हाला आरोग्यासंबंधीच्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. तसेच तुम्हाला आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागू शकतो.

हे सूर्यग्रहण कर्क राशीच्या बाराव्या भावावर लागणार आहे. हा भाव आर्थिक नुकसानीबाबत सूचित करतो. त्यामुळे या राशीच्या मंडळींनी सध्या जमीन, वाहन आणि वास्तूबाबत व्यवहार करू नये. प्रकृतीबाबत काळजी घ्यावी, तसेच वायफळ खर्च टाळावा.

वृश्चिक - Marathi News | वृश्चिक | Latest rashi-bhavishya Photos at Lokmat.com

हे सूर्यग्रहण वृश्चिक राशीच्या आठव्या भावात लागत आहे. हा भाव आपल्या प्रकृतीबाबत धोक्याचा इशारा देत आहे. त्यामुळे सध्या तुम्ही प्रत्येक प्रकारच्या संसर्गापासून स्वतःचा बचाव केला पाहिजे. तसेच कुटुंब आणि पैशांच्याबाबतीतही सावधगिरीने आणि समजुतदारीने निर्णय घेण्याची गरज आहे. त्याबरोबरच श्वासासंबंधातील आजारांबाबत विशेष खबरदारी. घ्या.

धनू - Marathi News | धनू | Latest rashi-bhavishya Photos at Lokmat.com

हे सूर्यग्रहण धनू राशीच्या सातव्या भावात लागणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्ही आधीच्या सूर्यग्रहणामुळे निर्माण झालेल्या त्रासापासून मुक्त व्हाल. तसेच यावेळी तुम्हाला ग्रहणाचा तितकासा त्रास सहन करावा लागणार नाही. पण तुमच्या कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात. तसेच कामाची अधिकची जबाबदारीही वाढू शकते. मात्र सद्यस्थितीत प्रकृतीची काळजी आधीपेक्षा अधिक घ्या.

कुंभ - Marathi News | कुंभ | Latest rashi-bhavishya Photos at Lokmat.com

हे ग्रहण कुंभ राशीच्या पाचव्या भावात लागणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण मानसिक तणाव घेऊन येत आहे. त्यामुळे मनःस्वास्थ्यासाठी ध्यानधारणा करावी. या स्थितीमुळे सध्यातरी कुठल्याही रिलेशनशिपमध्ये जाणे टाळा. मात्र तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहील. तसेच दैनंदिन खर्चही व्यवस्थित सुरू राहील.

करा हे उपाय - Marathi News | करा हे उपाय | Latest rashi-bhavishya Photos at Lokmat.com

ग्रहण काळात धार्मिक ग्रंथांचे वाचन करून स्वतःला प्रसन्न ठेवा. रोगशांतीसाठी महामृत्युंजय मंत्राचे पठण करा.

Read in English