Marashtra Bandha: पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये शुकशुकाट; कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 10:25 AM2021-10-11T10:25:20+5:302021-10-11T10:41:22+5:30

लखीमपूर येथील शेतकरी हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची (Marashtra Bandha) हाक दिली आहे. त्यामुळे मार्केट यार्डमधील सर्व संघटनाची संयुक्तरीत्या बैठकीमध्ये महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी मार्केट यार्ड बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. (सर्व छायचित्रे :- पंकज बिबवे)

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मार्केटयार्ड बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे ग्राहकांनी गजबजलेल्या अण्णासाहेब मगर पुतळा प्रवेशद्वाराशी असलेल्या परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आल्यामुळे शुकशुकाट पाहायला मिळत होता.

आठवड्याचा पहिला दिवस असतानाही महाराष्ट्र बंदच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गूळ व भुसार विभागातर्फे देखील कडकडीत बंद पाळण्यात आला होता.

मार्केटयार्ड बंद मुळे आज सकाळी ग्राहकांविना व्याप्याऱ्यांचे गाळे ओस पडले होते.

सणा सुदीचे दिवस असल्यामुळे फक्त फुल बाजार मार्केट थोड्या प्रमाणात चालू असल्याचे चित्र दिसून येत होते.