पुण्यात कालवा फुटला; घरांमध्ये घुसले पाणी...पाहा फोटोद्वारे हाहाकार...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 03:19 PM2018-09-27T15:19:15+5:302018-09-27T15:31:41+5:30

12 जुलै 1961 मध्ये पुण्याचे पानशेत धरण फुटल्याने सर्वत्र हाहाकार माजला होता. आज जनता वसाहत येथे मुठा कालवाल्या भगदाड पडल्याने पुण्यातील कालव्याशेजारील बहुतांश बैठी घरे पाण्याखाली गेली आहेत.

जनता वसाहत परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी घुसले

खडकवासला कालवा फुटल्याने अनेकांचे संसार वाहून गेले. अनेक घरात गुडघाभर पाणी साठले होते. घरातील भांडीकुंडी, टीव्ही, कपाटे आणि अगदी गॅस सिलेंडरही वाहून गेले.

पाण्याच्या प्रवाहात दुचाकींही वाहून जात होत्या.

दांडेकर पूल ते सारसबाग रस्ता परिसरात पूर सदृश्य परिस्थिती

कालव्याचे पाणी आंबील ओढ्याला गेल्याने त्याला ही पूर आला, त्यात अनेकांच्या घरातील साहित्य वाहून गेले

लोक वाहून गेलेले सामान शोधण्यासाठी भिडे पुलाजवळ गर्दी करत आहेत