शत-प्रतिशत भाजपचा डंका, पुण्यात धरला विजयी ठेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 02:06 PM2018-05-15T14:06:16+5:302018-05-15T14:06:16+5:30

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पक्षाने मिळवलेले यश पुण्यातही साजरे केले आहे. पुण्यात असणाऱ्या संत बसवेश्वर यांच्या पुतळ्याखाली भाजपने ढोल बडवत विजयाचा आनंद लुटला.

भाजपच्या नगरसेवकांनी पारंपरिक ढोल ताशावर ठेका धरला.

भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले या जल्लोषात सहभागी झाले होते.

कर्नाटकाच्या विजयाचे पुणे भाजपने बडवले ढोल