साऊथमध्ये निवडणुकीच्या रिंगणात असलेले सिनेकलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 04:32 PM2019-04-18T16:32:50+5:302019-04-18T16:47:57+5:30

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात अनेक सिनेकलाकार उतरले आहेत. तेलगू देशम पार्टीचे (TDP) आमदार आणि अभिनेता नंदमुरी बालकृष्ण यंदाच्या निवडणुकीत चर्चेत आहेत. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतून त्यांनी एका समर्थकाला मारहाण केल्याचे समोर आले आहे. नंदमुरी बालकृष्ण हे सिनेसृष्टीसह राजकारणातही सक्रिय आहेत. हिंदुपूर विधानसभा मतदारसंघातील टीडीपीचे आमदार आहेत. आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणुका सुरु आहेत. यंदाही याच मतदार संघातून नंदमुरी बालकृष्ण रिंगणात उतरले आहेत.

अभिनेता पवन कल्याण यांनी तर 'जन सेना' पार्टीची स्थापना केली आहे. पार्टी तीन जागांवर निवडणूक लढवत आहे. पवन कल्याण स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

अभिनेते प्रकाश राज बंगळुरु सेंट्रल लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्याबद्दल अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप करत प्रकाश राज यांनी निवडणूक आयोगाकडे काँग्रेसविरोधात तक्रार केली आहे.

याशिवाय, पश्चिम बंगालमधून अभिनेता बाबुल सुप्रियो निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे.

अभिनेत्री रुपा गांगुली सुद्धा लोकसभा निवडणूक लढवत आहे.