सेल्फी ले ले रे..

By admin | Published: August 17, 2015 12:00 AM2015-08-17T00:00:00+5:302015-08-17T00:00:00+5:30

तरूणाईत क्रेझ असलेला सुप्रसिद्ध लेखक चेतन भगत याने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा शेअर केलेला हा सेल्फी.

अभिनेत्री सोनम कपूरनेही पंतप्रधानांसोबतचा हा सेल्फी सोशल मीडियावर अपलोड केला होता.

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनाही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. प्रसिद्ध गायक सोनू निगमसह मोदींचा हा सुहास्य सेल्फी.

फ्रान्सच्या दौ-यावर असताना पंतप्रधानांनी फ्रेंच स्पेस एजन्सीला भेट दिली असता याठिकाणी शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांसोबत असा सेल्फी काढला.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात पार पडलेल्या निवडणूक प्रचार सभेदरम्यान पंतप्रधानांसोबत सेल्फी काढण्याचा मोह भाजपा नेत्या पूनम महाजन यांनाही आवरला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फिजी येथील एका नयनरम्य ठिकाणी पंतप्रधान बैनीमरामा यांच्यासोबत काढलेला सेल्फी.

मंगोलियाचे अध्यक्ष साखियाजिन एल्बेगदोर्ज यांच्यासोबतचा पंतप्रधान मोदींचा सेल्फी.

तरूणाईशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असलेल्या पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान टोनी अॅबॉट यांच्यासोबतचा हा फोटो अपलोड केला होता. प्रसिद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरील या सेल्फीला शेकडो लाईक्स मिळाले.

गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान केल्यानंतर नरेंद्र मोदींनी भाजपाचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळासोबत काढलेल्या सेल्फीमुळे वाद निर्माण झाला होता. आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप मोदींवर लावण्यात आला होता.

दोन शक्तीशाली नेत्यांचा सेल्फी... मे महिन्यात चीनच्या दौ-यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीनचे पंतप्रधान ली किकीयांग यांच्यासोबतचा हा सेल्फी खूप गाजला.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या सेल्फींसाठीही प्रसिद्ध आहेत. मोदींच्या परदेश दौ-यांप्रमाणे त्यांचे तेथील सेल्फीही अनेक वेळा गाजले आहेत. सध्या दोन दिवसांच्या युएई दौ-यावर असलेलेमोदी यांनी अबूधाबी येथील प्रसिद्ध शेख झायेद मशिदीत युएईतील नेते शेख नह्यान बिन मुबारक अल नह्यान आणि डॉ. अन्वर गर्गाश यांच्यासोबत सेल्फी काढला.