opinion poll : केरळमध्ये डावे, आसामात भाजपा, तर बंगालमध्ये असा असेल मतदारांचा कल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 11:22 PM2021-03-08T23:22:43+5:302021-03-09T10:29:51+5:30

Assembly elections 2021 Opinion poll : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमधील राजकीय कलांकडे राजकीय विश्लेषकांसह सर्वसामान्यांचेही लक्ष लागले आहे. दरम्यान, या राज्यांत कुठल्या पक्षाचे सरकार बनू शकते, याचा कल जाणून घेत टाइम्स नाऊ आणि सी-व्होटरने आपला सर्व्हे जाहीर केला आहे.

चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामधील विधानसभा निवडणुकीसाठी सध्या राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. तसेच राष्ट्रीय आणि प्रादेशिक असे सर्वच पक्ष निवडणुकीच्या प्रचारामध्ये गुंतले आहेत.

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमधील राजकीय कलांकडे राजकीय विश्लेषकांसह सर्वसामान्यांचेही लक्ष लागले आहे. दरम्यान, या राज्यांत कुठल्या पक्षाचे सरकार बनू शकते, याचा कल जाणून घेत टाइम्स नाऊ आणि सी-व्होटरने आपला सर्व्हे जाहीर केला आहे.

केरळ - Marathi News | केरळ | Latest politics Photos at Lokmat.com

या सर्व्हेनुसार केरळमध्ये लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ) पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. एलडीएफला एकूण १४० जागांपैकी ८२ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) ५६ जागांवर समाधान मानावे लागू शकते. भाजपाला केरळमध्ये यावेळीही एका जागेच्या वर जागा मिळण्याची शक्यता नाही.

तामिळनाडू - Marathi News | तामिळनाडू | Latest politics Photos at Lokmat.com

तामिळनाडूमध्ये यावेळी सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता या सर्व्हेमधून व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात सत्ताधारी असलेल्या अण्णा द्रमुक पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीला केवळ ६५ जागांवर समाधान मानावे लागू शकते. तर डीएमकेच्या नेतृत्वाखालील यूपीएला तब्बल १५८ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.

पुदुच्चेरी - Marathi News | पुदुच्चेरी | Latest politics Photos at Lokmat.com

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीमध्ये एनडीएला विजय मिळण्याची शक्यता आहे. या सर्व्हेनुसार ३० जागा असलेल्या या प्रदेशात एनडीएला १६ ते २० जागा मिळण्याची शक्यता आहे.

आसाम - Marathi News | आसाम | Latest politics Photos at Lokmat.com

आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपाची सरशी होण्याचा अंदाज या सर्व्हेमध्ये वर्तवला आहे. १२६ जागा असलेल्या आसाममध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला ६७ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर यावेळी यूपीएचीही चांगली कामगिरी होऊ शकते. यूपीएला ५७ पर्यंत जागा मिळू शकतात. तर इतर पक्षांच्या खात्यात दोन जागा जाऊ शकतात.

पश्चिम बंगाल - Marathi News | पश्चिम बंगाल | Latest politics Photos at Lokmat.com

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालमध्ये यावेळी अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. मात्र या निवडणुकीत ममता बॅनर्जीच बाजी मारतील, अशी चिन्हे आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला १५४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपाला १०७ पर्यंत जागा मिळू शकतात. पश्चिम बंगालसाठीच्या ओपिनियन पोलमधून मिळत असलेल्या कलांनुसार राज्यात तृणमूल काँग्रेसच्या जागा घटताना दिसत आहेत. भाजपाला फायदा होताना दिसत आहे.