Anil Deshmukh : म्हणून शरद पवारांनी अनिल देशमुखांच्या मागे उभी केलीय आपली पॉवर, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 08:20 PM2021-03-22T20:20:27+5:302021-03-22T20:26:47+5:30

Sharad Pawar & Anil Deshmukh News : परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज अनिल देशमुख यांच्याकडून गृहमंत्रिपदाचा राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. आता या प्रकरणात शरद पवार अनिल देशमुख यांच्यामागे का ऊभे आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज अनिल देशमुख यांच्याकडून गृहमंत्रिपदाचा राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच परमबीर सिंह यांनी आरोप केलेल्या काळात अनिल देशमुख हे कोविडवर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल होते आणि नंतर होम क्वारेंटाइन होते, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. मात्र आता या प्रकरणात शरद पवार अनिल देशमुख यांच्यामागे का ऊभे आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यास या संपूर्ण प्रकरणाचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसच्या डोक्यावर फुटू शकते. एवढेच नाही तर या संपूर्ण प्रकरणात अनिल देशमुख यांचा हात असल्याचा दावा केला जाईल. त्यामुळेच शरद पवार यांनी शरद पवार यांनी अनिल देशमुख यांचा बचाव केला.तसेच हे संपूर्ण प्रकरण राजकीय कारस्थान असून, भाजपाने ते परमबीर सिंह यांच्या मदतीने रचले असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.

अनिल देशमुख हे विदर्भातील आहेत. विदर्भात राष्ट्रवादीची ताकद मर्यादित आहे. त्यामुळे अनिल देशमुखांसारख्या वजनदार नेत्याची पक्षविस्तारासाठी मदत होऊ शकते याचा शरद पवार यांना अंदाज आहे. त्यामुळेच अनिल देशमुख यांच्याकडे गृहमंत्रालयासारखे वजनदार खाते सोपवण्यात आले आहे. भाजपाचे नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील आहेत. तसेच विदर्भात भाजपाची ताकदही अधिक आहे, त्यामुळे शरद पवार यांनी एका रणनीतीसह अनिल देशमुख यांना बळ दिले आहे.

अनिल देशमुख हे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय नेते मानले जातात. गेल्या वर्षी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी केल्यावर त्यांना पर्याय म्हणून अनिल देशमुख यांचे नाव पुढे आले होते. अखेर खातेवाटपामध्ये त्यांच्याकडे गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. अनिल देशमुख यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते शरद पवार यांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नाहीत. त्यामुळे गृहमंत्रालयावर अनिल देशमुख यांचा दबदबा निर्माण झालेला आहे.

अनिल देशमुख हे १९७० पासून राजकारणात सक्रीय आहेत. १९९२ मध्ये त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमधून प्रत्यक्ष राजकारणाला सुरुवात केली. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट नाकारल्यावर अपक्ष निवडणूक लढवली. त्यात विजयी झाल्यावर युती सरकारमध्ये ते मंत्री बनले होते. पुढे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. १९९५ ते २०२१ या काळात फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचा अपवाद वगळता ते सातत्याने राज्य सरकारमध्ये मंत्रिपदावर होते.