सुट्टी संपली! विद्यार्थी आणि शाळांना नव्या शैक्षणित वर्षाचे वेध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 03:24 PM2018-05-29T15:24:52+5:302018-05-29T15:24:52+5:30

उन्हाळ्याची सुट्टी आला संपत आली असून, विद्यार्थी आणि शाळांना आता नव्या शैक्षणित वर्षाचे वेध लागले आहेत. (सर्व छायाचित्रे : अतुल मारवाडी, पिंपरी-चिंचवड)

नवे वर्ष सुरू होण्यापूर्वी शाळांमधूनही झाडलोट, रंगरंगोटीची कामे सुरू आहेत.

राज्यभरात १५ जून रोजी शाळा सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शाळांची रंगरंगोटी करण्यात येत आहे. पिंपरीतील एका शाळेची सुरू असलेली रंगरंगोटी.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरीगावातील श्रीमती अनुसयाबाई नामदेव वाघेरे प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षासाठीची पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली आहेत. महापालिकेच्या सर्व शाळांकडे ही पुस्तके ५ जून रोजी सुपूर्द करण्यात येणार आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर ही पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत.