प्यार की निशानी; ऑलिम्पिकपटूच्या निधनानंतर प्रेयसीनं केलं त्याच्या शुक्राणूंचं बीजारोपण, वर्षभरानंतर दिली 'गोड बातमी'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 01:17 PM2021-06-29T13:17:41+5:302021-06-29T13:21:04+5:30

''माझ्या बॉयफ्रेंडच्या निधनानंतर २४ तासांत मी त्याच्या शूक्राणूंचं गर्भाशयात बीजारोपण केलं आणि वर्षभरानंतर त्याचं बाळ आता जन्माला येणार आहे,'' एलिडी व्ह्यूग ( Ellidy Vlug) हिची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. ( OH BABY! ‘I took my dead boyfriend’s sperm 24 hours AFTER he died and now I’m having his baby a year later’)

एलिडी व्ह्यूग ( Ellidy Vlug) हीनं प्रेग्नंट असल्याची आनंदाची बातमी दिली. पण, अन्य गर्भवती महिलांपेक्षा तिचा आनंद हा जगावेगळा आहे. प्रियकराच्या मृत्यूनंतर २४ तासांत तिनं त्याच्या शूक्राणूचे स्वतःच्या गर्भाशयात बीजारोपण केलं अन् वर्षभरानंतर ती बाळाला जन्म देणार आहे.

हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेतील स्नोबोर्डर अॅलेक्स 'चम्पी' पुल्लीन ( Snowboarder Alex 'Chumpy' Pullin ) याचे जुलै २०२०मध्ये वयाच्या ३२व्या वर्षी ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सर्फींग करताना निधन झाले. निधनापूर्वी पुल्लीन व व्ह्यूग यांचे आठ वर्षांचे प्रेम होते आणि त्याच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी त्याचे निरोगी शुक्राणू पुनर्प्राप्त करण्यात यश मिळवले.

त्याच्या मृत्यूला पुढील महिन्यात वर्ष पूर्ण होईल आणि तत्पूर्वी एलिडी व्ह्यूगनं ही गोड बातमी दिली. तिनं बेबी बंपचे फोटोशूट करून सोशल मीडियावरून ही बातमी दिली.

तिनं लिहिलं की, Bubba Chump या ऑक्टोबरला जगात दाखल होईल. तुझे वडील आणि मी वर्षभरापासून तुझ्यासाठी स्वप्न पाहत आहोत. तुझ्या वडिलांचे अपघातात निधन झाले. त्यानंतर त्यांच्या शुक्राणूचे बीजारोपण केले. त्याच महिन्यात मी गर्भवती होणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. IVFच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न सुरू ठेवले. आता तुझ्यारुपाने मला आनंदाचा क्षण मिळणार आहे.''

अॅलेक्सनं तीन हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची दोन जेतेपद पटकावली.

Read in English