महाराष्ट्र केसरी स्पेशल : दोस्तीत कुस्ती नाही, पण कुस्तीत दोस्ती असणारच...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 07:40 PM2020-01-07T19:40:12+5:302020-01-07T19:44:12+5:30

महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत चांगलीच अटीतटीची झाली. कारण या सामन्यात पहिला गुण शैलेश शेळकेने पटकावला होता.

त्यानंतर हर्षवर्धन सदगीरने एक गुण मिळवत बरोबरी केली होती.

सामन्याला एक मिनिट शिल्लक असताना हर्षवर्धन सदगीर १-२ अशा पिछाडीवर होता.

पण अखेरच्या 20 सेकंदात हर्षवर्धनने खेळ पालटविला, हर्षवर्धनने तिहेरी पट काढून 2 गुण घेतले आणि बाजी मारली.

हर्षवर्धनने अंतिम लढतीचा सामना ३-२ असा जिंकत जेतेपद पटकावले.

पण हा सामना जिंकल्यावर हर्षवर्धनने शैलेशला आपल्या खांद्यावर उचलून घेतल्याचे पाहायला मिळाले.

जेव्हा हर्षवर्धनने शैलेशला आपल्या खांद्यावर उचलले तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला.

काहींना तर या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता.

पण हर्षवर्धनने शैलेशला आपल्या खांद्यावर घेत मैदानाची एक फेरी मारली.

ही सर्व गोष्ट आश्चर्याचा धक्का बसणारी होती. पण त्यानंतर हर्षवर्धनला याबाबत विचारण्यात आले.

याबाबत हर्षवर्धन म्हणाला की, शैलेश हा माझा जीवलग मित्र आहे. त्यामुळे आमच्या दोस्तीत कुस्ती होणार नाही.