नेमबाजी विश्वचषकात शहजार रिझवीनं जिंकलं सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 03:37 PM2018-03-05T15:37:27+5:302018-03-05T15:37:27+5:30

भारताचा नेमबाज शहजार रिझवी याने पहिल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात विक्रमी सुवर्णपदक जिंकले. मूळचा मेरठचा असलेला रिझवी याने मेक्सिकोतील गुवादालाझारा शहरात सुरू असलेल्या या स्पर्धेच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील अंतिम फेरीत २४३.३ इतक्या विश्वविक्रमी गुणांची नोंद केली

जितू राय आणि मेहुली घोष यांना मात्र कांस्यवर समाधान मानावे लागले.

मेहुलीनेदेखील १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य जिंकले. त्याने २२८.४ गुणांची नोंद केली.