आंदोलकांची टूर टूर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 04:18 PM2018-07-26T16:18:36+5:302018-07-26T16:22:18+5:30

टूर दी फ्रान्स शर्यतीच्या 16व्या टप्प्यात आंदोलकांची टूर पाहायला मिळाली. काही स्थानिक शेतक-यांनी शर्यतपटूंच्या मार्गात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना स्प्रेचा वापर करावा लागला.

शेतक-यांनी मार्गात टाकलेल्या पेंढ्यांतून सायकलस्वारांना मार्ग काढावा लागला. 187 किलोमीटरच्या या प्रवासात प्रथमच शर्यतीला गालबोट लागले.

स्पर्धेत व्यत्यय आणणा-या आंदोलकांना पोलीस पकडून बाहेर करत होते.

शेतक-यांनी मार्गावर टाकलेल्या पेंढ्याचे गठ्ठे पोलिसांनाच हटवावे लागले. 1984नंतर प्रथमच या मार्गावर आंदोलकांनी ही शर्यत अडवल्याची घटना घडली.

ही शर्यत रोखण्यासाठी आंदोलकांनी मार्गावर मेंढ्यांचा कळप सोडला. त्यांनाही हटवण्यासाठी पोलिसांना प्रयत्न करावे लागले.

टॅग्स :क्रीडाSports