मॉडेलपेक्षाही सुंदर दिसते 'ही' खेळाडू, फोटो पाहाल तर प्रेमात पडाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 08:38 PM2020-02-28T20:38:38+5:302020-02-28T20:43:14+5:30

मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यशोशिखर गाठणारी रशियाची ही टेनिससुंदरी जगभरात लोकप्रिय आहे. या सुंदरीने काही जाहीरातीही केल्या आणि त्यामध्येच ती चांगलीच प्रसिद्ध झाली होती.

ग्लॅमरच्या दुनियेत पाऊल ठेवल्यावर तिला तोड नाही, असे काही चाहतेही म्हणत होते. या सुंदरीचे फोटो पाहून बरेच जण तिच्या प्रेमात पडतात. बऱ्याच चाहत्यांनी तिचे फोटो वायरलही केले आहेत.

आता ही सुंदरी कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर ही टेनिससुंदरी आहे मारिया शारापोव्हा. काही दिवसांपूर्वी शारापोव्हाने टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आणि पुन्हा एकदा ती चर्चेत आली.

मारिया शारापोव्हाने बुधवारी अचानकपणे व्यावसायिक खेळाडू म्हणून निवृत्ती जाहीर करताना क्रीडाविश्वाला धक्का दिला.

क्रीडाविश्वातील दिग्गज आणि नावाजलेल्या खेळाडूंमध्ये शारापोव्हाचा समावेश होत असून, गेल्या काही स्पर्धांपासून ती आपल्या खराब फॉर्मशी झगडत होती.

जगभरात सचिनचे करोडो चाहते आहेत. पण सचिन तेंडुलकर नेमका कोण, म्हणत टेनिस सम्राज्ञी मारिया शारापोव्हाने वादाला तोंड फोडले होते.

विम्बल्डनचा एक सामना पाहण्यासाठी सचिन आणि माजी महान फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहम गेले होते. या सामन्यानंतर काही पत्रकारांनी शारापोव्हाला एक प्रश्न विचारला होता. आजचा सामना पाहायला दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आला होता, तू त्याला ओळखतेस का? या प्रश्नावर शारापोव्हाने नाही असे उत्तर दिले होते आणि मोठा वाद निर्माण झाला होता.

दिग्गज क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला ओळखत नसल्याचे वक्तव्य केल्यानंतर शारापोव्हावर जगभरातील क्रिकेटप्रेमींनी फैलावर घेतले होते. यावेळी तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

दखल घेण्याची बाब म्हणजे शारापोव्हा २००५ ते २००८ सालादरम्यान इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केली जाणारी ‘स्पोर्ट्स सेलिब्रेटी’ ठरली होती.

शारापोव्हाने वयाच्या २०व्या वर्षी २००८ साली ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद पटकावले होते. यानंतर, तिने २०१२ आणि २०१४ साली फ्रेंच ओपन जेतेपदही उंचावले होते.

कारकिर्दीत अनेक दुखापतींना सामोरे गेलेल्या शारापोव्हाने २००३ ते २०१५ पर्यंत प्रत्येक वर्षी किमान एक स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

विशेष म्हणजे, महिलांमध्ये अशी कामगिरी या आधी केवळ स्टेफी ग्राफ, मार्टिना नवरातिलोवा व ख्रिस एव्हर्ट यांनीच केली आहे.