Bold & Beauty! भारताची पहिली महिला सर्फर इशितानं वेधलं क्रीडा विश्वाचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 06:41 PM2020-07-30T18:41:08+5:302020-07-30T18:43:56+5:30

इशिता मालवीय हे नाव कुणी ऐकलंही नसेल... भारताची पहिली व्यावयसायिक महिला सर्फर म्हणून इशितानं नाव मिळवलं आहे. समुद्रांच्या मोठ्या लाटांवर सर्फ बोर्डवर तरंगणाऱ्या इशितानं तिच्या बिनधास्तपणानं क्रीडा विश्वाचं लक्ष वेधलं आहे.

आतापर्यंत सर्फिंग हा केवळ आंतरराष्ट्रीत स्तरावर प्रसिद्ध होता, परंतु इशितामुळे भारतातही त्याला लोकप्रियता मिळू लागली आहे.

मुंबईच्या या खेळाडूनं पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं आहे. सर्फिंगचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती कर्नाटकला स्थायिक झाली.

2007मध्ये जर्मनिच्या एका विद्यार्थ्याची भेट झाल्यानंतर तिनं सर्फिगला सुरुवात केली. ती कर्नाटकमध्ये स्वतःचा एक सर्फिंग क्लबही चालवते.

ती आणि तिचा बॉयफ्रेंड कोंकण कोस्ट येथील एका गावात हा क्लब चालवतात. जगातील सर्वात मोठ्या एपेरल कंपनीची सदिच्छादूत बनणारी इशिता ही एकमेव भारतीय आहे.

2014मध्ये इशिता मालवीयवर एक डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली होती. त्यात तिनं आंतरराष्ट्रीय सर्फिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

इशिता सोशल मीडियावरही सक्रिय असते आणि तिच्या फॉलोअर्सची संख्याही प्रचंड आहे.

यंदा होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सर्फिंगचा समावेश केला गेला होता आणि कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा 2021मध्ये होणार आहे.