Corona Virus Lockdown : बॉक्सरपटूनं ऑर्डर केले 50 हजारांचे Pizza!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 04:25 PM2020-04-14T16:25:06+5:302020-04-14T16:29:27+5:30

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 19लाख 26,235 वर पोहोचली आहे. त्यापैली 1 लाख 19, 724 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर 4 लाख 52, 326 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे.

ब्रिटनमध्येही मागील चार आठवड्यापासून लॉकडाऊन आहे. वर्ल्ड बॉक्सिंग काऊंसिलचा हेव्हिवेट चॅम्पियन टायसन फुरी त्याच्या कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये आहे.

या लॉकडाऊनच्या काळात टायसननं जवळपास 557 पाऊंड किमतीचे पिझ्झा आणि चिकनची ऑर्डर दिली. भारतीय रकमेत या बिलाची किंमत ही जवळपास 50 हजाराच्या वर जात आहे.

ईस्टरच्या निम्मित्तानं त्यानं ही ऑर्डर दिली होती आणि त्याच्या या ऑर्डरची लंडनमध्ये चर्चा आहे.

टायसननं पिझ्झा आणि चिकनच्या ऑर्डरचा स्वीकार करताना डिलिव्हरी बॉयजपासून दोन मीटरचं अंतर ठेवलं होतं. टायसननं त्याला 100 पाऊंडची टीपही दिली.

टायसनचं कुटूंब मोठं आहे आणि तो एवढा खर्च सहज करू शकतो. लॉकडाऊनच्या काळात पैसा खर्च करण्यापलिकडे त्याच्याकडे काहीच काम नाही, असे त्याच्या नातेवाईकानं सांगितलं.

टायसन लंडनमध्ये त्याची पत्नी, पाच मुलं, आई आणि सासरे यांच्यासोबत राहत आहे.