दैवदुर्विलास! मृत्यू समोर दिसत असतानाही त्याला काहीच करता आलं नाही, वाचाल तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 04:56 PM2020-01-27T16:56:32+5:302020-01-27T17:08:51+5:30

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट याचा मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्नियाच्या कॅलाबॅससमध्ये झालेल्या या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये ब्रायंटच्या 13 वर्षाची मुलगीही होती.

या हेलिकॉप्टर आग कशी लागली हे अजूनपर्यंत समडू शकलेले नाही. पण काही कळायच्या आतमध्ये हे सारे विपरीत घडले. या हेलिकॉप्टरमध्ये ९ जणं होती. ज्यांना आपला मृत्यू समोर दिसतही असेल. पण तरी एवढी हतबल होती की, त्यांच्या हातामध्ये काहीच राहीलं नव्हतं. ब्रायंट हा महान खेळाडू होता. त्यामुळेच बऱ्याच सेलिब्रेटींनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की, " ब्रायंटच्या निधनाची बातमी वाचून धक्का बसला. कारण ब्रायंटशी जोडल्या गेलेल्या बऱ्याच आठवणी आहेत. आज त्या आठवणी पुन्हा एकदा डोळ्यासमोर आल्या. ब्रायंटच्या मुलीलाही या अपघातामध्ये आपला प्राण गमवावा लागला. हे सारे हृदयद्रावक आहे."

ब्रायंटला श्रद्धांजली वाहताना भारताचा सलामीवीर रोहित शर्मा म्हणाला की, " ब्रायंटच्या निधनाने क्रीडा विश्वाला आज एक वाईट बातमी मिळाली. ब्रायंट हा एक महान खेळाडू होता आणि त्याने आता या जगाचा निरोप घेतला आहे."

बॉलीवूड स्टार प्रियांका चोप्राने यावेळी एक भावुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये प्रियांकाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर आपण १३ वर्षांची असताना कशी ब्रायंटची भेट झाली होती, ही गोष्टदेखील सांगितली आहे.

बॉलीवूडचा स्टार अक्षय कुमारनेही ब्रायंटला ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. श्रद्धांजली वाहताना आपण निशब्द झालो असल्याचेही अक्षयने म्हटले आहे.

बॉलीवूड स्टार रणवीर सिंगनेही ब्रायंटला श्रद्धांजली वाहिली आहे. ब्रायंटच्या आत्म्याला शांती मिळो, अशी भावना रणवीर सिंगने व्यक्त केली आहे.