नवी मुंबई विमानतळाच्या कामाला गती; युद्धपातळीवर काम सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 11:35 PM2019-06-03T23:35:47+5:302019-06-04T06:31:13+5:30

मुंबई विमानतळावरील भार कमी व्हावा यासाठी नवी मुंबईत नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधले जात आहे.छायाचित्राद्वारे विमानतळाच्या सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भालचंद्र जुमलेदार यांनी.

या नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमान तळाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

यासाठी मोठी यंत्रणा कामाला लागली आहे. सिडको एक हजार १६० हेक्टरवर १६ हजार कोटी रुपये खर्च करून हे विमानतळ प्रकल्प उभारत आहे.

सध्याच्या घडीला उलवे नदीचा प्रवाह बदलण्याचे कामही वेगाने सुरू झाले आहे, तसेच अनेक गावांचे स्थलांतर करण्यात आले आहे, यावरून विमानतळाचे लवकर पूण होईल असे वाटते.

एअरपोर्टकरिता येथील दहा गावांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. डिसेंबरची डेडलाइन चुकू नये, म्हणून मोठ्या प्रमाणात कामाला गती देण्यात आली आहे.