'आधी टेस्ट करा, तरच तपासणार', तब्येत बिघडलेली असूनही डॉक्टरांकडून दुर्लक्ष ;रुग्णालयाबाहेर महिलेनं सोडला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 11:33 AM2021-04-29T11:33:54+5:302021-04-29T11:52:07+5:30

Woman death : तासनतास एकाच ठिकाणी थांबल्यानंतर बेड्स, औषधं उपलब्ध होत आहेत. तर काहींना रिकाम्या हातानं घरी परतावं लागत आहे.

कोरोनाच्या माहामारीकाळात अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. वैद्यकिय सुविधा मिळवण्यासाठी सर्वसामान्य आणि गरिबांची फरपट होताना दिसून येत आहे. तासनतास एकाच ठिकाणी थांबल्यानंतर बेड्स, औषधं उपलब्ध होत आहेत. तर काहींना रिकाम्या हातानं घरी परतावं लागत आहे.

दरम्यान माणुसकीला काळीमा फासणारी घटना राजस्थानच्या धौलपूरमधून समोर आली आहे. ही घटना जिल्हा बाडी उपखंडच्या सरकारी रुग्णालयासमोर घडली. रामसिंह कुशवाह याांच्या ५५ वर्षीय पत्नीची तब्येत खराब झाल्यानंतर त्यांना एक सराकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

नातेवाईकांनी सांगितले की, रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे महिलेला बाईकवर बसवून नेण्यात आलं. अशावेळी रस्त्यात पोलिसांनी अडवलं आणि २०० रूपयांचा दंड घेतला.

कसंबसं या महिलेला रुग्णालयात पोहोचवलं. पण डॉक्टरांनी या महिलेकडे फिरकूनही पाहिले नाही. डॉक्टरांनी कोरोनाची चाचणी करण्याची चिठ्ठी लिहून देत चाचणीसाठी पाठवले.

नवल सिंह कुशवाह यांनी सांगितले की, १० दिवसांपूर्वी या महिलेनं लस घेतली होती. काही दिवसांनी तब्येत खराब झाल्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आलं तेव्हा वाटेतच पोलिसांना अडवून दंड घेतला आणि रुग्णालयात पोहोचल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही.

डॉक्टरांनी आधी चाचणी करून यायला सांगितलं आणि चाचणी करून परत आल्यानंतर या महिलेनं रुग्णालयाच्या दरवाज्याजवळच प्राण सोडले.

रुग्णालयातील प्रमुख चिकित्स अधिकारी डॉ. शिवद्याल मंगल यांनी सांगितले की, ''या महिलेला रुग्णालयात आलं तेव्हा खूप ताप येत होता.

लस घेतल्यानंतरही या महिलेचा ताप उतरत नव्हता. आम्ही या महिलेला कोरोनाची चाचणी करण्यास पाठवलं त्यावेळी चाचणी करून आल्यानंतर रुग्णालयाबाहेरच या महिलेचा जीव गेला होता.

या प्रकरणात मृत महिलेचे नातेवाईक चुकीचा आरोप लावत आहेत.''