West Bengal Election 2021: कोब्रा कुठे आहे शोधा...; पश्चिम बंगालच्या निकालानंतर मिथुन चक्रवर्तींवरील Memes Viral

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 08:20 AM2021-05-03T08:20:43+5:302021-05-03T08:35:29+5:30

West Bengal Election 2021: ७ मार्चला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने २१३ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला. या विजयानंतर बंगालने भारताला वाचविले, अशी मार्मिक प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ममता बॅनर्जींच्या तृणमूलला स्पष्ट बहुमत मिळालं असं असलं तरी भाजपानेही मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा दमदार कामगिरी केल्याचं चित्र दिसत आहे. (West Bengal Election 2021)

तृणमूल काँग्रेसने २१३ जागांवर विजय मिळवला असून भाजपाला १०० च्या आतच रोखण्यात ममता बॅनर्जी यांना यश आलं आहे. भाजपाने ७७ जागांवर विजय मिळवला आहे. याच पार्श्वभूमीवर आता सोशल नेटवर्किंगवर प्रतिक्रिया उमटू लागल्यात. त्यातच ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनाही ट्रोल केलं जात आहे.

७ मार्चला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश करताच मिथुन चक्रवर्ती यांनी मी एक नंबरचा कोब्रा आहे... एक दंश जरी झाला तरी तुम्ही फोटो बनून जाल, असं विधान केलं होतं. मिथुन चक्रवर्ती यांचं हे विधान देशभरात खूप गाजलं देखील होतं. मात्र पश्चिम बंगालमध्ये भाजपाला सत्ता मिळवता न आल्यानं अनेकांनी सोशल मीडियावर भाजपाचा कोब्रा कुठे आहे?, असं म्हणत मिथुनदा यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

निवडणूकीत कोलकात्याचे मतदार झालेल्या मिथुनदांच्या सभांना मतदारांनी गर्दी तर केली. परंतु मतांमध्ये ती परावर्तित होऊ शकली नाही. याच पार्श्वभूमीवर आता सोशल नेटवर्किंगवर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

बंगालमध्ये भाजपाचा कोब्रा भाजपालाच डसला वाटतं, असं म्हणत मिथुन चक्रवर्ती यांना ट्रोल केलं जात आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालानंतर मिथुन चक्रवर्ती यांची रिअॅक्शन...

तेव्हा आणि आता...

कुठे आहेत मिस्टर कोब्राजी...असं सवाल उपस्थित केला आहे.

कोब्रा कुठे आहे, शोधा...

पश्चिम बंगालमध्ये कुणी भाजपात प्रवेश केला होता?, असं म्हणत मिथुन चक्रवर्तीं यांना टोला लगावला आहे.